मुंबई प्रतिनिधी
देशाची आर्थिक राजधानी मुंबईला लवकरच आणखी एका नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असल्याचे माहिती समोर आली आहे.
खरंतर सध्या मुंबईवरून सहा वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत.
महाराष्ट्रात बाबत बोलायचं झालं तर संपूर्ण राज्यात सध्या स्थितीला अकरा वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत.
राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर , सीएसएमटी ते शिर्डी , सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव , मुंबई सेंट्रल ते गांधीनगर , मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद , नागपूर ते बिलासपुर , नागपूर ते इंदोर , नागपूर ते सिकंदराबाद , पुणे ते कोल्हापूर आणि
पुणे ते हुबळी या अकरा मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू आहे. दरम्यान आता मुंबईमधील वंदे भारत एक्सप्रेस चे नेटवर्क आणखी स्ट्रॉंग होणार आहे कारण की शहराला एका नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असून यामुळे मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार आहे.
कोणत्या मार्गावर धावणार वंदे भारत ट्रेन?
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई ते नागपूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवले जाणार आहे. या मार्गावर सध्या धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत असून याच वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर वंदे भारत ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर दरम्यान वंदे भारत ट्रेन चालवली जाणार असून या दोन्ही शहरा दरम्यानचे 837 किलोमीटरचे अंतर वंदे भारत ट्रेन अवघ्या सहा ते नऊ तासात कापणार असल्याचा दावा केला जातोय.
सध्या ज्या एक्सप्रेस गाड्या सुरू आहेत त्यांना मुंबई ते नागपूर या प्रवासासाठी जवळपास वीस तासापर्यंतचा वेळ लागतो. दरम्यान आता आपण या वंदे भारत ट्रेनचे वेळापत्रक कस राहणार हे पाहणार आहोत.
कस असणार वेळापत्रक
मीडिया रिपोर्टनुसार, नागपूर – मुंबई वंदे भारत ट्रेन पहाटे पाच वाजता सोडली जाणार आहे आणि जवळपास नऊ तासानंतर म्हणजेच दुपारी दोन वाजता ही ट्रेन सीएसएमटीला पोहोचणार आहे.
सीएसएमटी – नागपूर वंदे भारत ट्रेन बाबत बोलायचं झालं तर ही गाडी सीएसएमटी येथून दुपारी तीन वाजता सोडली जाईल आणि रात्री 23.50 वाजता ही गाडी नागपूरला पोहोचणार आहे.
कोण – कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार?
मीडिया रिपोर्ट मध्ये असा दावा केला जात आहे की मुंबई ते नागपूर दरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन या मार्गावरील वर्धा, भंडारा, अकोला, भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, कल्याण आणि दादर या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेऊ शकते.
तिकीट दर कसे असणार ?
मुंबई – नागपूर वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दरबाबत बोलायचं झालं तर या गाडीचे एसी चेअर कारचे तिकीट दर हे अंदाजे 1500 ते 2000 रुपये असू शकते आणि एक्झिक्यूटिव्ह एसी कोचचे तिकीट दर हे 2500 ते 3000 रुपये एवढे असू शकते.


