
नवी दिल्ली वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक म्हणजे ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’. या योजनेद्वारे देशातील लाखो नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून कोणीही वंचित राहू नये, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
• काय आहे आयुष्मान भारत योजना?
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य विमा संरक्षण मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे आयुष्मान कार्ड असणे आवश्यक आहे.
या कार्डच्या माध्यमातून उपचार, शस्त्रक्रिया, औषधं, तसेच आवश्यक चाचण्या, हे सर्व पूर्णपणे मोफत दिले जातात.
• कोणत्या रुग्णालयांमध्ये मिळतो लाभ?
तुमच्या शहरातील बहुतांश सरकारी रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये तसेच काही खासगी रुग्णालये या योजनेशी संलग्न आहेत.
या रुग्णालयांमध्ये खालील आजारांवरील उपचार मोफत मिळतात
• हृदयविकार उपचार व शस्त्रक्रिया
• किडनीचे आजार
• कर्करोग उपचार
• सामान्य व आपत्कालीन शस्त्रक्रिया
प्रसूती आणि इतर विशेष वैद्यकीय सेवा
• तुमच्या परिसरातील रुग्णालयांची माहिती कशी मिळवावी?
तुमच्या शहरातील कोणती रुग्णालये आयुष्मान कार्ड स्वीकारतात हे जाणून घेण्यासाठी खालील सोपी प्रक्रिया वापरा –
1. सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या https://hospitals.pmjay.gov.in/Search/
2. “Find Hospitals” या पर्यायावर क्लिक करा.
3. तुमचं राज्य, जिल्हा, शहर किंवा पिनकोड निवडा.
4. सरकारी किंवा खासगी रुग्णालय या पर्यायांपैकी निवड करा.
5. “Search” वर क्लिक केल्यावर, तुमच्या परिसरातील सर्व मान्यताप्राप्त रुग्णालयांची यादी दिसेल.
या यादीत रुग्णालयाचं नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि उपलब्ध सेवा यांची सविस्तर माहिती दिलेली असेल.
त्याचबरोबर, प्रत्येक रुग्णालयावर क्लिक करून तुम्ही कोणते उपचार पॅकेजेस उपलब्ध आहेत हे देखील पाहू शकता.
हे लक्षात ठेवा
• आयुष्मान कार्ड मिळवण्यासाठी लाभार्थ्याने अधिकृत पोर्टल किंवा नजीकच्या CSC केंद्रावर संपर्क साधावा.
• उपचारापूर्वी रुग्णालयात कार्ड व्हेरिफिकेशन आवश्यक असते.
• योजनेअंतर्गत सर्व लाभ पूर्णतः कॅशलेस आणि पेपरलेस आहेत.
जनतेच्या आरोग्याचा हक्क प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारकडून सुरू केलेली ही योजना अनेक कुटुंबांसाठी जीवनदान ठरत आहे. तुमचंही नाव या योजनेत आहे का? तपासा आणि आरोग्य सुरक्षा मिळवा.