
पुणे (विभागीय प्रतिनिधी सुनील कलशेट्टी दि. १३ डिसेंबर)सुंधामाता नगर कात्रज येथील टेकडीवरील नागरिक ड्रेनेजचे घाण पाणी,सार्वजनिक रोड वरती सोडत असल्यामुळे रोड वरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना,वयस्कर नागरिकांना, अक्षरश आपला जीव मुठीत घेऊन चालाव लागते आहे .ड्रेनेजच्या घाण पाण्यामुळे रोड वरती मोटरसायकली, लहान मुले, व नागरिक घसरून पडत आहेत. तर रोडच्या बाजूलाच श्री सुंधा माता मंदिर आहे तरी मंदिरात दर्शनासाठी भाविकांना रोडवरच्या या घाण पाण्यातून कसरत करावी लागते. तरी याला जबाबदार कोण ? असे सवाल नागरिकांनकडून होत आहे.
मुत्त्वा घुडे वय वर्ष ५८ यांनी सांगितलं सुंधामाता नगर, सार्वजनिक रोडवरील ड्रेनेजच्या घाण पाण्यातून पायी रस्ता चालत असताना पाय घसरून पडल्यामुळे माझा हात फ्रॅक्चर झाला आहे, तर मी एक गरीब कुटुंबातील महिला असून यावरती मला खासगी दवाखान्यात २५००० रुपये दवाखान्याचा खर्च आला. तसेच दैनिक – प्रतिनिधीशी प्रतिक्रिया देताना शंकर चव्हाण यांनीही सांगितलं मी सुद्धा ह्या घाण पाण्यातून रस्ता ओलांडत असताना पाय घसरून पडलो तर याला जबाबदार कोण ? महानगरपालिका अधिकारी फक्त बघायची भूमिका घेत आहेत, परंतु इथे मात्र सर्वसामान्य नागरिकांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे ? ड्रेनेजच्या घाण पाण्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. आणि डेंगू मलेरिया सारख्या आजारांना नागरिक बळी पडत आहेत.सुंधा माता नगर कात्रज येथील नागरिकांच्या समस्येच्या पहाणी करण्यासाठी हडपसर युवक अध्यक्ष श्री अजय साबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
पुणे, खडकवासला विधानसभा अध्यक्ष श्री महेश इंगवले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल पुणे, शहर उपाध्यक्ष श्री सुनील कलशेट्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे, विद्यार्थी कार्याध्यक्ष दत्ता कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे, उपाध्यक्षा खडकवास विधानसभा सौ नंदा थोरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल पुणे, सुंधा माता नगर अध्यक्ष श्री शंकर चव्हाण, सौ पवार, सौ गोडसे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया प्रमुख श्री दादा इंगवले, उपाध्यक्ष अमेय जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया पुणे.यावेळेस सुंधा माता नगर कात्रज भागातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.