
पुणे (विभागीय प्रतिनिधी सुनील कलशेट्टी
पुणे- सदर बाबत माहिती अशी की, दि. २८/११/२०२४ रोजी सिंहगड रोडवर पोलीस स्टेशन हद्दीतील वडगाव धायरी भागातील सराफी दुकानांमध्ये एका अनोळखी इसमाने मुलाचा व पत्नीचा वाढदिवस आहे. असे सांगून, सोन्याची चैन खरेदी करण्याचा बहाणा करून ती गळ्यात घालून दुकानातून दुकानदार यांची नजर चुकून सोन्याच्या चैन चोरी करून घेऊन गेल्याने सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा मा पोलीस उपायुक्त परिमंडळ – ०३ पुणे शहर, व सहाय्यक पोलीस आयुक्त सो सिंहगड रोड विभाग पुणे यांचे आदेशाने तपास पथकातील तपास पथकाच्या दोन टीम तयार करून दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना,तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस हवालदार बक्कल नंबर २४६, तारू पोलीस शिपाई बक्कल नंबर ९१९१, क्षीरसागर पोलीस शिपाई बक्कल नंबर ०३ मोहिते यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सोनाराच्या दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात जाऊन त्यांच्या दुकानातील चैन चोरी करणार संशयित इसम हा कोथरूड परिसरामध्ये आहे. अशी बातमी मिळाली,सदरची बातमी कळवली असता वरिष्ठाने बातमीची खात्री करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन कोथरूड परिसरात संशयित आरोपीची शोध घेत असताना, दाखल गुन्ह्यातील अनोळखी इसम हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव कपिल जयराम चव्हाण वय वर्ष ३९ रा मूळ-मनवेलपाडा रोड महाकाली मंदिर, कारगिल नगर विरार ईस्ट वसई पालघर मुंबई सध्या रा घर नंबर ०६ रामचंद्र स्मृती बिल्डिंग गाढवे कॉलनी शास्त्रीनगर कोथरूड पुणे असे सांगितल्याने त्या सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ६९५/२०२४ बीएनएस २०२३ चे कलम ३०३ (२) या दाखल गुन्ह्यात दिनांक ०२/१२/२०२४ रोजी रात्री २०:१० वा. अटक करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्याच्याकडे अधिक तपास केले असता त्याने सिंहगड पोलीस स्टेशन वारजे माळवाडी, चतुश्रुंगी पोलीस स्टेशन हद्दीतील सोनाराच्या दुकानात जाऊन चेन चोरी केल्याचे सांगून दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या चेन त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आल्या असून खालील नमूद गुन्हे त्यांनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
१) सिंहगड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ६९५/२०२४ भारतीय न्याय
संहिता २०२३ चे कलम ३०३ (२)
२) सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रेस नंबर ६९६ / २०२४ भारतीय न्याय
संहिता २०२३ चे कलम ३०३ (२)
३) चतुश्रुंगी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ९५० / २०२४ भारतीय न्याय…
संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) (४) वारजे माळवाडी पोलीस स्टेशन गुन्हा नंबर ४४९ / २०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २०४,३१९ (२),३९८(२) वरील
गुन्हे केल्याची तपासात निष्पन्न झाल्याने पोलीस कस्टडी दरम्यान एकूण चार गुन्ह्यातील ०५ सोन्याच्या चैनी व गुन्हा करताना वापरली एक दुचाकी असा एकूण ३,६४,४८०/रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमो दारु पीस मा. न्यायालयाने न्यायालयीन कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील अधिक तपास श्री सचिन निकम सहाय्यक पोलीस निरीक्षक हे करीत आहेत.सदरची कामगिरी श्री अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री रंजन कुमार शर्मा पोलीस सह आयुक्त पुणे शहर श्री प्रवीण कुमार पाटील अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री संभाजी कदम मा पोलीस उपायुक्त परिमंडळ — ०३ श्री अजय परमार सह पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग पुणे शहर, श्री दिलीप दाईगडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर, मा. उत्तम भजनावळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक श्री संतोष भांडवलकर,पोलीस अंमलदार संजय शिंदे, अण्णा केकाण, उत्तम तारू, पंकज देशमुख,देवा चव्हाण, अमोल पाटील विकास पांडोळे, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, सागर शेंडगे, स्वप्निल मगर, विनायक मोहिते, विकास बांदल, यांचे पथकाने केली.