
पुणे : व्यावसायिक गॅसचा काळाबाजार समोर आला असून, सिंहगड रस्ता पोलिसांनी छापा टाकून गॅस सिलिंडरच्या तब्बल ७२ टाक्या पकडल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी टेम्पो तसेच गॅस टाक्या असा दहा लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
सामाजिक सुरक्षा पथकास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून गोपनीय माहीती मिळाली की, तुकाईनगर, परिसर, वडगाव बुद्रुक, पुणे येथे गॅस रिफिलींग स्टेशनचा कोणताही परवाना न बाळगता बेकायदेशीरपणे एच.पी. गॅस व भारत पेट्रोलियम गॅस कंपनीचे घरगुती वापराचे व व्यावसाईक वापराच्या गॅस सिलेंडर प्राप्त केले जात आहे. त्यानुसा या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. काही व्यक्ती बेकायदेशीरपणे एच.पी. गॅस व भारत पेट्रोलियम गॅस कंपनीचे घरगुती वापराचे व व्यावसाईक वापराच्या गॅस सिलेंडर प्राप्त करुन जीवनावश्यक वस्तु कायद्याचा भंग करून घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधुन रिफिलिंग पाईपचा वापर करुन व्यावसाईक वापराच्या सिलेंडर मध्ये गॅस भरत असताना चार आरोपी सापडले. संबंधित आरोपीं विरुद्ध सिंहगड पोलिस स्टेशन येथे भा.द.वि. कलम 285, 286,34, जीवनावश्यक वस्तु कायदा कलम 3 व 7 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त, पुणे शहर रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त गुन्हे पुणे शहर रामनाथ पोकळे, पोलिस उप आयुक्त, गुन्हे अमोल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सपोनि अश्विनी पाटील, सपोनि अनिकेत पोटे, पोलिस अंमलदार, राजेंद्र कुमावत, अजय राणे बाबा कर्पे, मनिषा पुकाळे, हनुमंत कांबळे, इम्रान नदाफ रेश्मा कंक, संदीप कोळगे, अमित जमदाडे, किशोर भुजबळ या पथकाने केली आहे.