स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई : र. अ. कि. मार्ग पोलीस ठाण्यात २००५ साली दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यातील २० वर्षे फरार असलेल्या आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी जावेद युसूफ शेख (वय ४८) हा दीर्घकाळ न्यायालयासमोर हजर राहत नसल्याने सत्र न्यायालय, मुंबई यांनी त्याला फरार घोषित करून स्थायी अटक वॉरंट जारी केले होते.
परिमंडळ ४ अंतर्गत सध्या राबविण्यात येत असलेल्या फरार आरोपी शोधमोहीमे दरम्यान, जावेद शेख हा ठाणे शहरातील भाड्याच्या घरात लपून राहत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. २० नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री र. अ. कि. मार्ग पोलिसांचे पथक ठाण्यात दाखल होऊन आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यास फेरअटकेसह न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त सत्य नारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ४ रागसुधा आर., सहायक पोलीस आयुक्त (माटुंगा) सचिन कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप ऐदाळे, पोउनि पल्लवी जाधव, पोउपनि महागावकर, स. फौजदार संभाजी कडलग, पोलीस हवालदार मंगेश बारसिंग, बाळासाहेब राठोड आणि महिला पोलीस शिपाई निलम लोहार यांनी केली.


