
पुणे (विभागीय प्रतिनिधी सुनील कलशेट्टी
पुणे (दि ०२ जानेवारी २०२५) –१८१८ सली झालेल्या युद्धात पेशव्यावर मिळवलेल्या विजयाची आठवण म्हणून येथे मोठा विजयस्तंभ उभारण्यात आला आहे.त्यावर महार बांधव ज्यांनी आपले बलिदान दिले त्यांची नावे यावर कोरली गेली आहेत . येथे दरवर्षीच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ ज्याने वारीला हजारो दलित बांधव येथील विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमतात.
पुण्यातील कोरेगाव भीमा मध्ये २०७ च्या शौर्य दिनाचा उत्सव मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. दरवर्षी १ जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी येत असतात. यंदाही ३१ डिसेंबर पासूनच अभिवादनासाठी अनुयायांची गर्दी सुरू झाली होती. लाखोच्या संख्येने येथे अनुयायी दाखल झाले होते.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्तंभास अभिवादन केले त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना एक कविता देखील सादर केली.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही केले अभिवादन. त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले भीमा कोरेगाव शौर्य दिवस आपल्या पूर्वजांच्या जातीय अत्याचाराविरोध्च्या लढ्यातलं एक पाऊल पुढे टाकण्याची आठवण आहे. ५०० महार सैनिक ज्यांच्या ब्राह्मणवादी पेशव्यांचा सैनिकांवर व केलेल्या विजयापासून प्रेरणा घ्या, तुम्ही विजय स्तंभाला भेट द्याल तेव्हा, सैनिकांचा सन्मान करा आणि बाबासाहेबांच्या आकांक्षा आणि महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपले मत द्या. असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्तंभास अभिवादन केले, व माध्यमाशी संवाद करताना म्हणाले की, मी मंत्रीपदावर वगैरे नाराज नसून, मलाही काही भावना आहेत. बरे दिवस आमदार होतो, त्यामुळे मित्रांच्या गाठीभेटी झालेल्या नव्हत्या म्हणून मी बाहेर फिरण्यासाठी गेलो होतो. तरी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाराज नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
भीमा कोरेगाव लढाईचा नेमका इतिहास काय आहे
कोरेगावच्या युद्धात दुसरे बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वात मराठ्यांचे २८००० हजारांचे सैन्य सज्ज करण्यात आले होते. आक्रमणावेळी त्यांच्यासमोर इंग्रज सैन्याची कुमक असलेली तुकडी उभी ठाकली, या तुकडीत ८०० सैनिकाचा समावेश होता. पेशव्यांनी कोरेगाव येथे असलेल्या इंग्रजांच्या सैन्यावर आक्रमक करण्यासाठी २००० सैनिकाचा समावेश असलेली फौज पाठवली. फ्रान्सिस यांच्या नेतृत्वात इंग्रजांच्या सैन्याने १२ तास ही खिंड लढवली आणि पेशव्यांना माघार घेण्यास भाग पाडले. कारण त्याचवेळी जनरल जोसेफ स्मिथ यांच्या नेतृत्वाखालील मोठे सैन्य दाखल झाले तर युद्ध करणे अवघड जाईल म्हणून मराठा सैन्याने परत त्याचा निर्णय घेतला. या लढाईत इंग्रजांच्या सैन्यात भारतीय वंशाची काही सैनिक होते. यात बहुतांश महार समाजाचे होते त्यामुळेच ही लढाई दलित समाजाकडून दलित चळवळीच्या इतिहासातील महत्त्वाची मानली जाते.
भीमा कोरेगांवच युद्ध जरी पेशवा विरुद्ध इंग्रज असे झाले असले तरी इंग्रजांनी महार सैनिकांच्या बळावर युद्ध पुकारले होते. महार समाजाचे लोक मोठ्या संख्येने इंग्रजांच्या सैन्यात भरती झाले ते इंग्रजांचे साम्राज्य भारतात पसरवण्यासाठी नव्हे तर जाचक पेशवाई नष्ट करण्याचे त्यांचे ध्येय होते. असे काही इतिहासकार म्हणतात. भीमा कोरेगावच्या या लढाईत महार रेजिमेंटने इंग्रजांना विजय मिळवून दिला होता. अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या सैनिकांनी समतेच्या लढाईत प्राणाची आहुती दिली, त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या शौर्याचे प्रतिक म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगाव मध्ये एक भव्य क्रांतीस्तंभ उभारला. कोरेगावच्या लढाईत शौर्य गाजून वीरमरण पत्करलेल्या सैनिकांची नांवें स्तंभावरील भव्य अश्या स्तंभावर कोरण्यात आली आहेत. १ जानेवारी १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही या क्रांतीच्या स्तंभाला आपल्या सहकाऱ्यांसह भेट देऊन मानवंदना दिली होती. बाबासाहेब आंबेडकरांच्या या मानवंदनेनंतर दरवर्षी १ जानेवारीला दलित समाज व आंबेडकर अनुयायी अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
प्रशासनाकडून नियोजनाची जय्यत तयारी करण्यात आली होती यावर्षी भारतीय संविधानाची अमृत महोत्सवाच्या हत्तीवर ऐतिहासिक विजय स्तंभास फुलांची सजावट करण्यात आली असून त्यासाठी ७० हजार कृत्रिम आणि १ हजार किलो खऱ्या फुलांचा वापर करण्यात आला होता.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त.
कोरेगाव भीमा या ठिकाणी ५००० पोलीस कर्मचारी,७५० पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले होते या सोबतच १००० होमगार्ड आणि आठ कंपन्या काम करत आहेत. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ५० पोलीस टॉवर, १० ड्रोन आणि चोरी रोखण्यासाठी विशेष पोलीस पथक आहेत, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. कोणत्याही प्रकारची दंगल होण्यासाठी सोशल मीडियावरही निर्बंध करण्यात आले होते कोणी काही आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास योग्य ती करावी करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले .