
पत्रकार :उमेश गायगवळे
पुणे.. नववर्षाचे नुकतेच स्वागत झाले असतानाच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या भीषण अपघातामध्ये पुण्यातील संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला आहे. पुणे नगर महामार्गावर कार आणि मोटरसायकलच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.
पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील सितेवाडी गावाच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या १३ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.
जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथील रहिवासी असणारे निलेश कुटे बुधवारी मोटरसायकलवरून पत्नी जयश्री आणि मुलगी सानवी हिला घेऊन कल्याणकडे जात होते. तेव्हा सितेवाडी गावाच्या हद्दीत आल्यानंतर कल्याणकडून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या कारची आणि कुटे यांच्या मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली.
हा अपघात इतका भीषण होता की या धडकेमध्ये निलेश कुटे, त्यांची पत्नी जयश्री कुटे आणि १३ वर्षांची मुलगी सानवी कुटे यांचा मृत्यू जागच्या जागी झाला. संपूर्ण कुटुंब अपघातात मृत्यूमुखी पडल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.