नवी दिल्ली वृत्तसंस्था
नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर केंद्र सरकारने २०२६ मधील शासकीय सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. आगामी वर्षात कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या अनिवार्य व पर्यायी सुट्ट्यांचा तपशील समोर आला असून, अनेक महत्त्वाच्या सण-उत्सवांसाठी कार्यालये व बँका बंद राहणार आहेत. विविध राज्यांमध्ये साजऱ्या होणाऱ्या सणांनुसार काही सुट्ट्या स्थानिक पातळीवर बदलणार आहेत.
केंद्राच्या सुटी यादीत १४ अनिवार्य सुट्ट्यांचा समावेश असून, याशिवाय कर्मचाऱ्यांना स्वतःच्या पसंतीने निवडण्यासाठी ३ अतिरिक्त सुट्ट्यांची मुभा देण्यात आली आहे. तसेच १२ पर्यायी सुट्ट्याही निश्चित करण्यात आल्या आहेत. प्रत्येक राज्यात सांस्कृतिक व धार्मिक वैशिष्ट्यांनुसार स्वतंत्र सुट्या लागू होतील.
२०२६ मधील मुख्य शासकीय सुट्ट्या
• २६ जानेवारी – प्रजासत्ताक दिन
• ४ मार्च – होळी
• २९ मार्च – ईद-उल-फितर
• ३१ मार्च – राम नवमी
• १ एप्रिल – महावीर जयंती
• ३ एप्रिल – गुड फ्रायडे
• ३१ मे – बुद्ध पौर्णिमा
• २६ जून – बकरी ईद
• १५ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन
• ४ सप्टेंबर – जन्माष्टमी
• २४ सप्टेंबर – ईद-ए-मिलाद
• २ ऑक्टोबर – महात्मा गांधी जयंती
• २१ ऑक्टोबर – दसरा
• २१ नोव्हेंबर – दिवाळी
• २९ नोव्हेंबर – गुरूनानक जयंती
• २५ डिसेंबर – ख्रिसमस
कर्मचाऱ्यांना निवडता येणाऱ्या सुट्ट्या (३ निवडीची मुभा)
• १ जानेवारी – नवीन वर्ष
• १४ जानेवारी – मकर संक्रांती
• १६ जानेवारी – वसंत पंचमी
• १२ फेब्रुवारी – गुरु रविदास जयंती
• २६ फेब्रुवारी – होलिका दहन
• १९ मार्च – गुढी पाडवा
• ५ एप्रिल – ईस्टर
• ८ मे – रविंद्रनाथ टागोर जयंती
• २६ ऑगस्ट – ओणम
• १४ सप्टेंबर – गणेश चतुर्थी
• १८ ऑक्टोबर – दसरा (स्थानिक)
• ३० ऑक्टोबर – करवाचौथ
• १४ डिसेंबर – ख्रिसमस (स्थानिक)
ऑप्शनल सुट्ट्यांची यादी
दसरा, होळी, जन्माष्टमी, राम नवमी, महाशिवरात्री, गणेश चतुर्थी, मकर संक्रांती, रथ यात्रा, ओणम, पोंगल, वसंत पंचमी, गुढी पाडवा
२०२६ मध्ये शनिवार-रविवारसह अनेक सुट्ट्यांची मेजवानी असणार आहे. नवीन वर्षात प्रवासाचे नियोजन, धार्मिक उत्सव किंवा कौटुंबिक आयोजनांसाठी या सुटी यादीचा नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. सरकारच्या वार्षिक सुटी कॅलेंडरमुळे शासकीय कर्मचारी तसेच बँक कर्मचारी वर्षभराचे नियोजन निश्चित करू शकणार आहेत.


