मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील साकीनाका पोलिसांनी पुन्हा एकदा ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश केलाय. वसईमध्ये MK ग्रीन सिमेंट ब्लॉक बनवणाऱ्या एका कारखान्यात ड्रग्सची निर्मिती होत असल्याचा प्रकार पोलिसांच्या कारवाईतून उघड झाला.
या कारवाईमध्ये साकीनाका पोलिसांनी ४ किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. या चार किलो MD ड्रग्जची किंमत ८ कोटी रुपये असल्याचं माहिती मिळत आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी ३ आरोपींना अटक करण्यात आलीय. अटक आरोपीचे नाव सादिक शेख,सिराज पंजवाणी,सय्यद इराणी आहे,हे सराईत आरोपी असून या आरोपीवर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.
काही दिवसापूर्वी साकीनाका परिसरात MD ड्रग्ज विकणाऱ्या एका आरोपीला साकीनाका पोलिसांनी अटक केली होती. या आरोपीकडून या वसईच्या फॅक्टरीची माहिती मिळाली होती. दरम्यान यामध्ये मुख्य आरोपी फरार असून त्याच्या शोध साकीनाका पोलिसांकडून घेतला जात आहे
पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी या कारवाईबाबत माहिती दिलीय. साकीनाका पोलिसांना एक आरोपी साकीनाकामधील संजीवनी चौकात ड्रग्जची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी शादील शेख याला ताब्यात घेतलं. त्याची झडती घेताना त्यांच्याकडे ५३ ग्रॅम एमडी सापडले. या ड्रग्जची किंमत अंदाजे १० लाख रुपये होती. त्याची चौकशी केल्यानंतर वसई येथील फॅक्टरीची माहिती मिळाली.
त्यानंतर ६० तासाच्या आत साकीनाका पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत ड्रग्जच्या फॅक्टरीचा शोध लावला. वसईतील कामगाव येथे सिमेंट ब्लॉक बनवण्याचा कारखाना होता. तेथील एका पत्र्याच्या शेडमध्ये ड्रग्स बनवण्याचे उद्योग सुरू होता. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ड्रग्स बनवण्यासाठी लागणारे मशीन आणि तसेच दोन फ्रिज जप्त करण्यात आली आहेत. कारवाईत ४ किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून त्याची किंमत ८ कोटी इतकी आहे.


