
जळगाव प्रतिनिधी
आज जागतिक महिला दिन जगभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दुसरीकडे या दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले.
त्यात त्यांनी थेट आम्हाला खू करण्याची परवानगी द्या, अशी मागणी केली. नेमकी अशी मागणी त्यांनी का केली आहे, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. तर त्यांचे पत्र सद्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
रोहिणी खडसे यांनी पत्रात म्हटले आहे की, सर्वात प्रथम आपल्याला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपला देश हा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. जे शांतीचे अहिंसेचे मोठे प्रतीक आहे तरी आपली क्षमा मागून वरील मागणी करत आहे. त्याचे कारणही मात्र तसेच आहे.
महिलांवरील अत्याचारांत वाढ
देशात महिला मोठ्या प्रमाणात असुरक्षित आहेत. येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ होत आहे. दोनच दिवसांपूर्वी देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे एका 12 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले. राष्ट्रपती महोदया, 12 वर्षीय! विचार करा काय परिस्थिती असेल?, त्यामुळे आम्हाला अशा नराधमांना मारण्याची परवानगी द्या, अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली आहे.