नवी दिल्ली :
नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या २१ दिवसांपासून जंतर-मंतर येथे उपोषणाला बसलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी उपोषणस्थळावरून हटवून रुग्णालयात दाखल केले. या कारवाईनंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप करत नरेंद्र मोदी यांच्यावरही तीव्र टीका केली आहे.
CJP Founder Abhijeet Dipke’s video message after he was let go by the Police – once the Police had successfully kidnapped Sonam Wangchuk from Jantar Mantar.
He has been beaten up by the Police. CJP protesters have been lathi charged badly at Jantar Mantar. pic.twitter.com/6ZRAirwxzg
— Cockroach is Back (@Cockroachisback) July 18, 2026
दिपके यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये दावा केला की, दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना शिवीगाळ करत फरफटत नेले. तसेच, त्यांनाही मारहाण करून काही काळ नजरकैदेत ठेवण्यात आले. “नरेंद्र मोदी हुकुमशहा असून दिल्ली पोलीस हे आरएसएसचे गुंड आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
Delhi police have forcefully taken Sonam Wangchuk sir to unknown location. pic.twitter.com/Gn0ytvrHwe
— Cockroach is Back (@Cockroachisback) July 18, 2026
दिपके यांच्या म्हणण्यानुसार, सकाळी ते मित्राच्या घरी गेले असताना दिल्ली पोलिसांनी कारवाई करत सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतले. त्यानंतर ते जंतर-मंतरकडे जाण्यासाठी निघाले असता पोलिसांनी त्यांना अडवून मारहाण केली आणि काही काळ नजरकैदेत ठेवले. वांगचुक यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली, मात्र जंतर-मंतर परिसरात प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
#WATCH | Delhi: Founding President of the Cockroach Janta Party, Abhijeet Dipke says, "At 7 AM, when I stepped out to freshen up, police goons arrived here. They dragged Sonam Sir away while hurling abuse at him. A 60-year-old man, who had been on a hunger strike for 20 days and… pic.twitter.com/Z21kIV68sd
— ANI (@ANI) July 18, 2026
दिपके यांनी आरोप केला की, पोलिसांच्या कारवाईदरम्यान आंदोलनस्थळी उपस्थित विद्यार्थ्यांवरही लाठीचार्ज करण्यात आला तसेच काहींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले. “गेल्या २० दिवसांपासून उपोषण करणाऱ्या साठ वर्षीय व्यक्तीला फरफटत नेण्यात आले. त्यांना कुठे नेले आहे, याचीही माहिती दिली जात नव्हती,” असेही त्यांनी म्हटले.
देशातील लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप करत दिपके यांनी नागरिकांनी शांततापूर्ण मार्गाने सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलन करावे, असे आवाहन केले. दरम्यान, दिल्ली पोलिसांकडून या आरोपांवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.


