मुंबई प्रतिनिधी
मुंबई : बेस्ट बस डेपोसाठी राखीव असलेल्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या आदेशाचे पालन न केल्याने सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यावर ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी त्यांना अवमानना नोटीस बजावण्यात आली आहे.
मुंबईतील बेस्ट बस डेपोसाठी निश्चित केलेल्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या दोन आदेशांचे पालन न झाल्याने आयुक्तांविरोधात न्यायालयीन अवमानाची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
या प्रकरणात आयुक्तांसह त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. बेस्ट बसस्थानकासाठी राखीव असलेल्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने महापालिका प्रशासनाला न्यायालयाच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे.


