रणजित मस्के, प्रतिनिधी
बीड: जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून, गेवराई पोलिसांनी पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई केली आहे। वाळूची अवैध वाहतूक करणारा एक हायवा ट्रक पकडण्यात आला असून, मुद्देमालासह तब्बल २० लाख ३० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे।
पहाटेची कारवाई आणि थरार
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशानुसार गेवराई पोलीस स्टेशनचे पथक बायपास रोडवर गस्त घालत होते। ३ मे २०२६ रोजी पहाटे ३:५० च्या सुमारास नॅशनल हायवे क्रमांक ५२ वरील दत्तराज पार्कच्या कमानीजवळ एक संशयास्पद हायवा पोलिसांना दिसला पोलिसांनी हा हायवा थांबवून तपासणी केली असता, त्यात ६ ब्रास अवैध वाळू आढळून आली
चालकाला अटक, गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलिसांनी हायवा चालक सय्यद शाकेर सय्यद हसन (वय ४६ वर्षे, रा. लिंबागणेश) याला ताब्यात घेतले आहे. गेवराई पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर २७०/२०२६ आणि भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।
या टीमने केली कारवाई
या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उप विभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके, पोलीस निरीक्षक किशोर पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, पोलीस हवालदार कल्याण राठोड, पोलीस कॉन्स्टेबल गोरक्ष डोके आणि पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र ओव्हाळ यांनी सहभाग घेतला.


