रणजित मस्के:प्रतिनिधी
सातारा : अवघ्या चार तासांत खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा करत सातारा तालुका पोलिसांनी आरोपीला अटक करत चपळाईचे दर्शन घडवले आहे. आरफळ (ता. सातारा) हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
१२ एप्रिल २०२६ रोजी गावंधर शिवारात काम करत असताना फिर्यादीच्या पतीने काही युवक पेट्रोल काढत असतानाचा व्हिडिओ व्हायरल करू नये, असे सांगितल्याचा राग मनात धरून आरोपीने संतापाच्या भरात खोऱ्याने डोक्यात वार करून त्यांची हत्या केली. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलवली. डी.बी. पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे शिवथर येथून संशयिताला ताब्यात घेतले. कसून चौकशीदरम्यान आरोपीने खुनाची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार, मोबाईल आणि दुचाकी वाहन जप्त केले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश तांबे करीत आहेत.
या कारवाईत सहभागी सर्व अधिकारी व कर्मचारी : सुदर्शन काटकर, अभिजीत गुरव, मनोज गायकवाड, दादा स्वामी, संदिप पांडव, राजू शिखरे, उमेश माने, शिवाजी वायदंडे, प्रविण वायदंडे, रामचंद्र गोरे, मालोजी चव्हाण, सुनिल भोसले, अजित निकम, रायसिंग घोरपडे, विद्या कुंभार, किरण निकम, संदिप फणसे, शंकर पाचांगणे तसेच होमगार्ड विवेक शेडगे, विठ्ठल सावंत, वश चव्हाण, नागराज भुजबळ, साहिल शेख, प्रसाद पवार, प्रसाद जाधव, निखिल सणस, श्रीधर भोईटे, प्रकाश चव्हाण, सिंधु ननावरे, वनिता कणसे.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व पथकाचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.


