स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई : सिनेमा दिग्दर्शकाच्या जुहू येथील निवासस्थानी १ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणी गुन्हे शाखेने आणखी सहा आरोपींना अटक केली असून एकूण अकरा जणांना जेरबंद करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्या आरोपीचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी जुहू पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला होता. पुढे तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून खंडणीविरोधी कक्षामार्फत सखोल चौकशी सुरू आहे. सुरुवातीला पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर उत्तर प्रदेश एस.टी.एफ. आणि हरियाणा एस.टी.एफ. यांच्या मदतीने आणखी सहा आरोपींना जेरबंद करण्यात आले.
या प्रकरणात कठोर कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून सर्व आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन व विशाल ठाकुर, सहाय्यक पोलीस आयुक्त सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील प्र.पो.नि. घनश्याम नायर, पो.नि. संजय तरळगट्टी, सुनिल पवार, अरुण थोरात, लक्ष्मण साळुंखे, दिपक सावंत, रविंद्र मांजरे तसेच स.पो.नि. अमोल माळी, रामदास कदम, अजय बिराजदार, प्रताप बंडगर आणि इतर अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली.


