
बिड प्रतिनिधी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आताेत मोठ्या घडामोडी घडत आहेत. खंडणी प्रकरणी वाल्मीक कराडला अटक केल्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. त्याला आज सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर झालेल्या सुनावणीत त्याला पुन्हा पोलीस कोठडी देण्याची सीआयडीची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.
वाल्मीक कराडची रवागनी १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात आता वाल्मीक कराडवर मोक्का लावण्यात आला आहे. यामुळे वाल्मीक कराडच्या अडचणी वाढले आहेत.
मोक्का कायद्यात अशी आहे शिक्षा
वाल्मीक कराडवर मोक्का लावल्यानंतर परळीत मात्र तणाव निर्माण झाला आहे. त्याच्या समर्थकांनी आक्रमक होत आंदोलन सुरू केलं असून परळी बंदची हाक दिलीय. परळीतील बहुतांश दुकाने आणि व्यवहार बंद करण्यात आले आहेत. मोक्का लावल्यानंतर वाल्मीक कराडच्या पत्नी मंजिली यांनी या प्रकरणात राजकारण होत असल्याचे आरोप केले आहेत. नो
माझे पती दोषी नाहीत हे सिद्ध झालं असतानाही एखाद्यावर जाणीवपूर्वक आरोप केले जात असतील तर चुकीचं आहे. जातीवाद केला जात आहे. जातीवादाशिवाय दुसरं काय आहे. शेवटी लोक उतरणारच रस्त्यावर, जातीवाद आणायला नको होता. गुन्हेगाराला जात नसते. जातीवादाचं राजकारण बंद करावं अशी मागणी वाल्मीक कराडची पत्नी मंजिली यांनी केली.
संतोष देशमुख यांच्या मुलीने म्हटलं की, वाल्मीक कराडला मोक्का लावण्याची मागणी केली होती. आमची मागणी आहे की माझ्या व़डिलांची ज्यांनी हत्या केली त्यांना यात सहआरोपी करावं. ज्यांनी कोणी हत्या केली त्या प्रत्येकावर मकोका लागलाच पाहिजे अशी संतोष यांची मुलगी वैभवीने प्रतिक्रिया दिली.
वाल्मीक कराडवर संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप – एसआयटी
संतोष यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आमचा पोलीस आणि मुख्यमंत्र्यांवर विश्वास असल्याचं म्हटलंय. यंत्रणांवर विश्वास असून ते नक्की काम करतील. यात आणखी कोण असतील त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून मोक्का लावावा अशी मागणी करत आहे. त्यांनी तपासाचा भाग म्हणून मकोका लावला. आमची वेगळी मागणी काही नाही असं ते म्हणाले.