
बीड प्रतिनिधी
एका नर्तिकेच्या नादी लागून लाखो रुपये, सोनं-नाणं आणि शेतजमीन गमावलेल्या माजी उपसरपंचाने अखेर बंदुकीच्या गोळीने आत्महत्या केली. गोविंद जगन्नाथ बर्गे (३८) असं या माजी उपसरपंचाचं नाव असून या प्रकरणी नर्तिका पूजा देविदास गायकवाड हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बर्गे यांची पूजा हिच्याशी ओळख एका कला केंद्रात झाली होती. त्यानंतर तिने त्यांच्यासोबत प्रेमसंबंध ठेवले. त्यातून वेळोवेळी दागिने, पैसे आणि शेतीजमीन घेऊन दिली होती. इतकंच नाही तर बलात्कार प्रकरण उघड करण्याची धमकी देत बर्गे यांना वारंवार ब्लॅकमेल करण्यात आलं.
पैशांची वसुली आणि सततच्या त्रासाला कंटाळून गोविंद बर्गे यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर मृत उपसरपंचाचा मेहुणा लक्ष्मण चव्हाण यांनी तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.