नवी दिल्ली वृत्तसंस्था
भारतीय वायुसेनेच्या सामर्थ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत आज (२९ ऑक्टोबर) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी अंबाला एअरबेसवरून राफेल लढाऊ विमानातून भरारी घेतली. त्यांच्या या उड्डाणामुळे पाकिस्तानने केलेला “राफेल पाडल्याचा” खोटा दावा अक्षरशः धुळीस मिळाला.
President Droupadi Murmu took a sortie in a Rafale aircraft at Air Force Station, Ambala, Haryana. She is the first President of India to take sortie in two fighter aircrafts of the Indian Air Force. Earlier, she took a sortie in Sukhoi 30 MKI in 2023. pic.twitter.com/Rvj1ebaCou
— President of India (@rashtrapatibhvn) October 29, 2025
अलीकडेच ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानकडून सोशल मीडियावर असा प्रचार करण्यात आला होता की त्यांनी भारताचे राफेल विमान पाडले असून एक भारतीय वैमानिक पकडला आहे. एवढेच नव्हे, तर त्या वैमानिकाचे नाव विंग कमांडर शिवांगी सिंह असल्याचा खोटा दावा करण्यात आला होता. मात्र आज अंबाला एअरबेसवर राष्ट्रपती मुर्मूंच्या उपस्थितीत याच शिवांगी सिंह या पायलट दिसल्या आणि पाकिस्तानचा बनावट दावा पूर्णपणे फोल ठरला.
विंग कमांडर शिवांगी सिंह या भारतीय वायुसेनेतील पहिल्या महिला राफेल पायलट आहेत. उड्डाणापूर्वी राष्ट्रपती मुर्मू आणि शिवांगी सिंह यांचे छायाचित्र विशेष चर्चेत राहिले. दोघींच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहूनच पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांना तडा गेला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
BREAKING:
राफेल की उड़ान के साथ
पाकिस्तान का एक एक प्रोपेगंडा धुंआ धुंआ 🔥
📌राष्ट्रपति द्रौपदी मुर्मु स्क्वाड्रन लीडर शिवांगी सिंह के साथ नज़र आईं ।
🇮🇳 भारतीय वायुसेना की वहीं पायलट जिनके बारे OperationSindoor #IAF #ShivangiSingh #PresidentMurmu #FakeNews #PakistanPropaganda pic.twitter.com/WvPRVpfP63— Manoj (@Mpareek112) October 29, 2025
राष्ट्रपती मुर्मू यांनी घेतलेले हे राफेल उड्डाण सुमारे अर्धा तास चालले. त्यांनी सुमारे १५ हजार फूट उंचीवर, ७०० किलोमीटर प्रतितास वेगाने उड्डाण केले. या विमानाचे सारथ्य १७व्या स्क्वॉड्रनचे कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन अमित गेहानी यांनी केले.
या उड्डाणानंतर राष्ट्रपती मुर्मू यांनी व्हिजिटर बुकमध्ये आपला अनुभव नोंदवला. त्या म्हणाल्या, “अंबाला वायुसेना स्टेशनवर येऊन राफेल विमानातून उड्डाण करण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरला. या शक्तिशाली विमानात बसून देशाच्या संरक्षण क्षमतेबद्दल नव्याने अभिमान वाटला.”
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात राष्ट्रपती मुर्मूंनी आसाममधील तेजपूर एअरबेसवरून सुखोई-३० MKI लढाऊ विमानातून उड्डाण केले होते. आता राफेलमधून भरारी घेत त्यांनी दोन वेगवेगळ्या लढाऊ विमानांमधून उड्डाण करणाऱ्या देशाच्या पहिल्या राष्ट्रपतीचा मान पटकावला आहे.
राष्ट्रपतींच्या या दौऱ्यामुळे भारतीय वायुसेनेच्या सामर्थ्यावर देशवासीयांचा विश्वास अधिक दृढ झाला असून, पाकिस्तानच्या अफवांना यानिमित्ताने चोख उत्तर मिळाले आहे.


