
मुंबई प्रतिनिधी
भारत-पाकिस्तान सामना म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी मेजवानीच. आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवत विजेतेपद पटकावले. या सामन्यात तिलक वर्माने निर्णायक खेळी करत ‘प्लेअर ऑफ द मॅच’ किताब पटकावला. तर संपूर्ण मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या अभिषेक शर्माला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून गौरवण्यात आलं.
अभिषेक शर्माने या स्पर्धेत तब्बल 314 धावा काढल्या. त्यात तीन अर्धशतकांचा समावेश होता. जरी अंतिम सामन्यात तो फक्त 5 धावा करून बाद झाला, तरी सातत्यपूर्ण फलंदाजीमुळे त्याने सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान पटकावलं.
आलिशान गिफ्ट
अभिषेकला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्कारासोबत आलिशान Haval H9 SUV कार गिफ्ट मिळाली आहे. सात सीटर असलेली ही कार लक्झरी फीचर्स आणि दमदार ऑफ-रोडिंग क्षमतेसाठी ओळखली जाते. सध्या भारतात उपलब्ध नसली, तरी वर्षाअखेरीस ती बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.
HAVALच्या सौदी अरेबिया वेबसाइटनुसार या कारची किंमत भारतात सुमारे ₹33.60 लाख इतकी असू शकते. ही SUV चिनी ऑटोमोबाईल कंपनी GWM बनवते.
Haval H9 SUV ची वैशिष्ट्यं
• 14.6 इंचाचं टचस्क्रीन
• 10 स्पीकर साउंड सिस्टम
• वायरलेस चार्जिंग सुविधा
• ब्लाइंड स्पॉट सेन्सर्स
• 360 डिग्री कॅमेरा
• आरामदायी सीट्स आणि लक्झरी इंटिरिअर्स
या सर्व सुविधांसोबतच ऑफ-रोडिंगसाठी उपयुक्त असल्याने ही SUV विशेष ठरते.
अभिषेक शर्माच्या दमदार कामगिरीमुळे भारताने आशिया कप 2025 मध्ये विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली, तर गिफ्ट स्वरूपात मिळालेली आलिशान SUV त्याच्या यशात भर घालणारी ठरली आहे.