
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई – काळाचौकी पोलिसांनी कॉटनग्रीन परिसरात कारवाई करून १५ लाख ४० हजार रुपये किमतीचा मेफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थ जप्त केला. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
काळाचौकी पोलिसांना १० ऑगस्ट रोजी गुप्त माहिती मिळाली होती की, झकेरीया बंदर रोड, वैभव बार अँड रेस्टॉरंट समोर, रूम क्रमांक ६०५ मध्ये दोन व्यक्ती अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला असता, समिर भाई हिंमत भाई बाल्लार (४२) आणि मोहम्मद शकील अहमद यार मोहम्मद खान (२७) हे दोघे पळून जाण्याच्या तयारीत असताना पकडले.
त्यांच्याकडे ७७ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) आढळून आला, ज्याची बाजारमूल्य अंदाजे १५ लाख ४० हजार रुपये आहे. विक्रीच्या उद्देशाने हा माल जवळ बाळगल्याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त सत्यनारायण, अप्पर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ रागसुधा आर. यांच्या देखरेखीखाली, सहाय्यक पोलीस आयुक्त भोईवाडा विभाग व वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळाचौकी यांच्या पथकाने केली.