
नवी दिल्ली प्रतिनिधी
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील राजकीय तापमान अचानक वाढले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकाच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वतंत्रपणे भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्ररा तीभवनाकडून सोशल मीडियावर या भेटींची माहिती देण्यात आली, मात्र या भेटींचं कारण अधिकृतपणे उघड केलेलं नाही. तरीही, सलग दोन टॉप नेत्यांची राष्ट्रपतींशी भेट दिल्लीच्या राजकारणात अनेक तर्क-वितर्कांना आमंत्रण देत आहे.
Prime Minister Shri @narendramodi called on President Droupadi Murmu at Rashtrapati Bhavan. pic.twitter.com/i6NdTtSDD9
— President of India (@rashtrapatibhvn) August 3, 2025
पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा देत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. याशिवाय बिहारमधील निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेवरून विरोधक सरकारवर आक्रमक झाले आहेत.
राजकीय तज्ज्ञांच्या मते, मोदी आणि शाह यांच्या या भेटी येत्या काही दिवसांत होणाऱ्या एखाद्या मोठ्या निर्णयाची चाहूल देत आहेत. पुढील पावलांवर संपूर्ण देशाची नजर लागली आहे.