
कर्नाटक
“सेल्फी घेऊ या” असं म्हणत पत्नीने नवऱ्याला पुलावर नेलं आणि अचानक नदीत ढकललं! ही धक्कादायक घटना कर्नाटकातील यादगीर जिल्ह्यात घडली असून, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पतीने आपल्या पत्नीला माहेरातून परत आणलं होतं. दोघं दुचाकीवरून सासरी परतत असताना पत्नीने एका नदीच्या पुलावर थांबण्यास सांगितलं. तिथं सेल्फी काढायची विनंती करत तिने नवऱ्याला जवळ बोलावलं आणि अचानक त्याला धक्का देत थेट नदीत ढकललं.
खबर कर्नाटक के रायचुर से नई शादी किए हुए पति पत्नी बाइक से जा रहे थे रास्ते में कृष्णा नदी का ब्रिज आया, पत्नी ने पति को कहा रुको सेल्फी लेते हैं उड़ी दौरान पत्नी ने पति को नदी में धक्का दे दिया।
पति देव को लोगों ने रस्सी के सहारे बचा लिया। यानि कालू राम बच गया।😡😡😎😎 pic.twitter.com/KYk8yXHBis
— S.C.Rana (@S_CRana_ji) July 13, 2025
धक्कादायक बाब म्हणजे, पत्नीने घरी परतताच अश्रू ढाळत सांगितलं की पतीचा पाय घसरला आणि तो नदीत पडला. घरच्यांनी घाबरून शोधाशोध सुरू केली. मात्र, काही वेळातच त्या नवऱ्याचा चमत्कारिकरीत्या जीव वाचला. पाण्यात पडताना त्याने कठड्याला धरलं आणि एक मोठा दगड लागून तो तिथेच अडकला. आरडाओरड करत त्याने मदतीसाठी आवाज दिला आणि स्थानिकांनी धाव घेत त्याला वाचवलं.
घरी परतल्यावर पत्नीसमोर नवरा उभा ठाकला आणि सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. त्याने स्पष्टपणे सांगितलं की, पत्नीने त्याच्या जिवावर घात केला. या घटनेनंतर पतीने थेट पोलिसांकडे धाव घेतली असून पत्नीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओही चौकशीचा भाग ठरणार असल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं आहे.
नदीत ढकलण्यामागचं कारण अजून गुलदस्त्यात; तपास यंत्रणा सतर्क
पती-पत्नीमधील वैमनस्य, आर्थिक कारणं की आणखी काही? पत्नीने पतीच्या जीवावर का घात केला, याचा तपास पोलीस करत आहेत. यादगीर जिल्ह्यात घडलेली ही घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे.