नवी दिल्ली वृत्तसंस्था
सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत मिळणाऱ्या मोफत धान्य योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत रेशनकार्डचे e-KYC पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. निर्धारित कालावधीत प्रक्रिया पूर्ण न केल्यास १ जानेवारी २०२६ पासून धान्य वितरण तात्पुरते स्थगित होऊ शकते, अशी माहिती प्रशासनाने दिली.
अनेक लाभार्थ्यांची e-KYC प्रक्रिया अद्याप प्रलंबित असल्याचे लक्षात आल्यानंतर ही मोहीम राबवण्यात येत असून, शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षा न करता तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
• मोहिमेचा उद्देश
या उपक्रमामागील प्रमुख हेतू
लाभार्थी यादीत पारदर्शकता आणणे
बनावट व अपात्र नावे वगळणे
योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंतच पोहोचवणे
अधिकाऱ्यांनी सांगितले की, e-KYC मुळे डेटाबेस अद्ययावत होईल आणि धान्य वितरण व्यवस्था अधिक कार्यक्षम होणार आहे.
• e-KYC न केल्यास काय होणार?
निर्धारित मुदतीपूर्वी प्रक्रिया पूर्ण न झाल्यास
मोफत धान्य वितरण बंद होऊ शकते
रेशनकार्डाशी निगडित इतर योजना रोखल्या जाऊ शकतात
नाव यादीतून तात्पुरते वगळले जाऊ शकते
म्हणूनच, लाभार्थ्यांनी अंतिम तारखेपूर्वी KYC पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
• घरबसल्या e-KYC स्टेटस कसे तपासाल?
मोबाईलवरून स्टेटस तपासण्यासाठी-
मोबाईलमध्ये ‘Mera Ration’ ॲप डाउनलोड करा
रेशनकार्ड / आधार क्रमांक टाका
मोबाईलवर आलेला OTP भरून व्हेरिफिकेशन करा
राज्य व जिल्हा निवडा
‘Manage Family Detail’ किंवा ‘Know Your Entitlement’ पर्याय निवडा
नावापुढे दिसणारे संकेत
‘Y’ = e-KYC पूर्ण
‘N’ = e-KYC प्रलंबित
• मोबाईलवरून e-KYC कशी कराल?
जर e-KYC अपूर्ण असेल तर खालील प्रक्रिया करा
‘Mera e-KYC’ आणि ‘Aadhaar FaceRD’ ॲप्स डाउनलोड करा
राज्य व स्थानाची माहिती भरा
कुटुंबप्रमुखाचा आधार / रेशनकार्ड क्रमांक टाका
कॅप्चा भरून ‘Generate OTP’ करा
प्राप्त OTP प्रविष्ट करा
Face e-KYC साठी कॅमेरा सुरू होईल
कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे फेस-ऑथेंटिकेशन आवश्यक
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर KYC सबमिट करा
अधिकाऱ्यांनी सूचित केले की, अंतिम दिवसांत सिस्टमवर ताण वाढू शकतो, त्यामुळे प्रक्रिया लवकर पूर्ण करणे हितावह ठरेल.
• लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
आधार-लिंक मोबाईल क्रमांक जवळ ठेवा
चेहरा स्कॅन करताना पुरेसा प्रकाश असावा
शंका असल्यास
जवळच्या राशन दुकानदाराशी
जनसुविधा केंद्राशी
स्थानिक PDS अधिकाऱ्यांशी संपर्क साधा
• “वेळेत KYC करा योजनांचा लाभ सुरू ठेवा”
नवीन वर्षात धान्य वितरणात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून सरकारतर्फे ही मोहीम राबवली जात असून,
“वेळेत KYC करा योजनांचा लाभ सुरू ठेवा” असा संदेश नागरिकांना देण्यात आला आहे.


