
पुणे (विभागीय प्रतिनिधी,सुनील कलशेट्टी
पुणे (दिनांक ०९ जानेवारी २०२५)-बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीवर पक्ष न पाहता कारवाई होणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली ग्वाही,
उपमुख्यमंत्री अजित पवार रात्री दिल्लीहून पुण्याला उशिरा पोहोचले . सकाळी ७ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज कुलगुरू, सिनेट सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी कडून विविध कार्यक्रमा विकास कामाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण सुविधा मिळाव्यात यासाठी शासन कटीबद्ध आहे. सेंट्रल किचन, नवीन हॉस्टेल, संशोधनासाठी निधी आणि जागतिक दर्जाच्या स्विमिंग पुलासाठी शासन आवश्यक किती मदत करेल, असं आश्वासन यावेळी दिली.
त्यानंतर उपमुख्यमंत्री यांनी पुणे साखर संकुल येथे साखर आयुक्त कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेणाऱ्या बैठकीला उपस्थिती दर्शवली. अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्याची भेटीगाठी घेत श्री छत्रपती मार्केट कमिटीचे संचालक तथा पर्वती विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री संतोष नांगरे यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे प्रकाशन केले व तसेच संचालक संतोष नांगरे यांच्या नवीन गाडीचे अजित पवार यांच्या हस्ते गाडीचे पूजन केलं
उपमुख्य अजित पवार यांनी पुणे येथे अधिकाऱ्यांची बैठकीत पुण्यातील विकास कामात आढावा घेतला. आहे या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
धनंजय मुंडे चा राजीनामा घेतला जाणार का. ?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मंत्री धनंजय मुंडे च्या राजीनामा घेतला जाणार का ? याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्यावर तरी थेट भाष्य केलं आहे. याशिवाय आज या प्रकरणाची न्यायालयाची चौकशी सुरू आहे. तसेच आता या तीन एजन्सी चौकशी करत आहेत, मात्र जे कोणी दोषी असेल ते सिद्ध झालं तर कारवाई करीन आणि चौकशी सुरू आहे.
याशिवाय सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सापडला वेळ लागला. तसेच महाराष्ट्रात अजिबात या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. दरम्यान, या प्रकरणातील कोणताही पुरावा नसताना कोणावर आरोप करणं कितपत योग्य आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. या सगळ्या जो कोणी जोशी आढळून येईल त्यावर कठोर कारवाई केली जाईल, यात मी देखील मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटलो, तेव्हा त्यांना सांगितलं की कोणीही कोणत्याही पक्षाचा असला आणि जर दोषी आढळला तर कारवाई करा यावर त्यांनी देखील याच मताचा. असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. या सगळ्यात कोणावर देखील अन्याय होणार नाही याची देखील आम्हाला खबरदारी घ्यावी लागेल. तसेच जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, विरोधकांना उद्देशून बोलताना अजित पवार म्हणाले, नुसते आरोप करण्यापेक्षा तुम्ही पुरावे द्या, पोलिसांना द्या, एस आयटीला द्या . सीआयडीला द्या, यातून चौकशीसाठी मदत होईल. पुराव्याशिवाय आरोप करणे चुकीचा आहे. आरोप करण्यापेक्षा तपासणीला पुरावे द्या. मी तुम्हाला आश्वासन देतो यात आम्ही कुठलेही राजकारण आणणार नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणार.
दरम्यान, पुण्यातील प्रश्नावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणेकरांचा वाहतुकीचा प्रश्न फार जटील बनला आहे. त्यामुळे आपल्याला यावर तोडगा काढण्याशिवाय अत्यंत नाही. त्यामुळे मी या संदर्भात सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. पुन्हा एकदा बैठक होणार असून यात मी लोकप्रतिनिधींना देखील सामील करून घेणार आहे. तसेच पीसीएमसी आयुक्त ने देखील माझा वेळ घेतला होता, त्यात पिंपरी ते काही चांगली कामे करण्यात आली आहेत, त्या संदर्भात देखील मी चर्चा केली आहे. या शोभत पुण्यात गुन्हेगारी वाढत असून नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची देखील त्यांनी माहिती दिली आहे.
यावेळी अजित पवार अनेक विषयांवर माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी अजित पवार यांना राज्यातील शिक्षकांचा पगार रखडला असल्याबाबत प्रश्न विचारला. नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दर महिन्यात पगार मिळत असतो. पगार हा प्रत्येकांसाठी नाजूक विषय आहे. दरम्यान शिक्षकांचा पगाराबाबत प्रश्न विचारला असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांना जागेवरच फोन लावला. आणि याबाबत माहिती घेतली. अजित पवार हे पुण्यात बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिक्षकांचा पगार कटला आहे, त्याबाबत प्रश्न विचारला असतं अजित पवारांनी थेट अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन लावला आणि याबाबत माहिती घेतली. पगाराचा निधी दिला गेला नाही का ? या संदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली यावेळेस अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांनी निधी दिला गेला असल्याचे सांगितले. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या कार्यशैलीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.