
पुणे (विभागीय प्रतिनिधी सुनील कलशेट्टी
पुणे (दिनांक ६ जानेवारी)-सुंधा माता नगर कात्रज येथे सुंधा माता मंदिराच्या मागच्या रोडवर अचानक मेन लाईटचा खांब कोसळला. सुदैवाने कुठलीही वित्तहानी झालेली नाही. ही बातमी कळताच खडकवासला विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे अध्यक्ष महेश( दादा )इंगवले आणि तात्काळ धाव घेतली व परिस्थितीची पाहणी केली.
सुंधा माता नगर कात्रज येथील नागरिक अनेक दिवसापासून बऱ्याच नागरी सुविधेच्या प्रश्नांना तोड द्यावे लागत आहे. त्यातच काल दिनांक ५ जानेवारी २०२५ अंदाजे वेळ ५ .वा ३० मिनिटाच्या दरम्यान. सुंधा माता मंदिराच्या मागच्या रोडवर अचानक मेन लाईटचा खांब कोसळला परंतु म्हणी प्रमाणे “देव तारी त्याला कोण मारी”
सुदैवाने विद्युत प्रवाह चालू असलेले मेन लाईटचे काम कोसळले असता त्यामध्ये कुठल्याही प्रकारची वित्तहानी घडलेली नाही. ही बातमी सुंदर माता नगर कात्रजचे अध्यक्ष शंकर चव्हाण यांनी अध्यक्ष श्री महेश दादा इंगवले यांना फोन करून कळवले. लागलीच अध्यक्ष महेश दादा इंगवले यांनी सुंधा माता नगर कडे धाव घेतली आणि परिस्थितीची पाणी करून लगेच भारतीय विद्यापीठ वंडर सिटी येथील एम एस ई बी चे अधिकारी श्री महाजन साहेब यांना सत्य परिस्थिती ची घटना फोनवरून सांगितली. एम एस ई बी चे अधिकारी महाजन साहेब यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ एम एस ई बी च्या कर्मचाऱ्यांना घटनेस्थळी पाठवून दिले आणि मेन लाईट प्रवाह बंद करून तात्पुरती येथील नागरिकांना दुसरीकडून विद्युत प्रवाह चालू करून नागरिकांची गैरसोय दूर केली. याबद्दल अध्यक्ष श्री महेश दादा इंगवले यांनी एम एस ई बी चे कर्तव्यदक्ष अधिकारी श्री महाजन साहेब यांचे व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
आज रोजी दिनांक ६ जानेवारी २०२५ कोसळलेल्या मेन लाईटचे काम उभे करून वायरिंग चे काम चालू आहे तरी या कामास अध्यक्ष श्री महेश दादा इंगोले यांना सुंधा माता नगर अध्यक्ष शंकर चव्हाण व उपाध्यक्ष गुडे काका आणि स्थानिक नागरिकांचे सहकार्य लाभले.