
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई| उत्तर प्रदेश येथे एका ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर फोडून तब्बल ₹५७ लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास करणारे दोन चोरटे मुंबईत पळून आले. मात्र, मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने सापळा रचून केवळ २४ तासांत त्यांना मुद्देमालासह पकडून चोरीवर पूर्णविराम दिला.
गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आरोपी बोरीवली परिसरात येणार असल्याचे समजताच पथकाने टेहळणी सुरू केली. त्यानंतर (१) सौरभ तानाजी साठे (२१) आणि (२) मोहन मारुती पवार (२४) या दोघांना थरारक कारवाईत ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून ४७८.४५ ग्रॅम सोन्याचे दागिने (₹४८ लाख), ८ किलो कच्ची चांदी (₹४.७६ लाख), ३.७९५ किलो पक्की चांदी (₹४.५० लाख) आणि रोख ₹२०,००० असा मिळून एकूण ₹५७,४६,००० किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला.
ही कारवाई, पोलीस आयुक्त – देवेन भारती,पोलीस सहआयुक्त (गुन्हे) – लखमी गौतम,अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) – शैलेश बलकवडे,पोलीस उपआयुक्त (प्र-१) – विशाल ठाकूर,सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रकटीकरण-उत्तर) – राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
प्रत्यक्ष कारवाईत, वपोनि मनोहर आव्हाड, वपोनि सचिन गवस, प्रपोनि भरत घोणे,पोनि बाबासाहेब काकडे,पोनि राउत,पोह सुर्वे, पोह गोवळकर,पोह मेऱ्या,पोह खताते, पोह खांडेकर,पोह शिंदे,सफौचा ढगे,सफौ चव्हाण, सफौ खान,पोह लिम्हन,पोह बने,पोह सावंत,पोह गोरुले,पोह राणे,पोह गोमे,पोह शिंदे,पोह भोसले,पोशि धोत्रे यांनी सिंहाचा वाटा उचलला.
मुंबई गुन्हे शाखेचा दबदबा पुन्हा एकदा दिसला — चोरटे सोन्यासकट पोलीसांच्या जाळ्यात!