
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
उल्हासनगर | ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने उल्हासनगर कॅम्प क्र. ४ येथील सुर्या लॉजवर छापा टाकून दोन असहाय्य मुलींची सुटका केली. लॉज चालकाने मुलींना फूस लावून वेश्याव्यवसायासाठी बोलावले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे यांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १४३(१), १४३(३) सह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंध) विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे यांच्या पथकाने केली. पथकात पोलीस हवालदार व्ही. आर. पाटील, आर. यू. सुवारे, व्ही. जी. नाईक, के. बी. पाटील, पी. जी. खरात, एच. आर. थोरात, के. एम. चांदेकर आणि एस. सी. पाटील यांचा समावेश होता.