
अमरावती : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील भिवंडी आणि अमरावती येथे राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच एनआयएने छापा टाकला आहे. या कारवाई दरम्यान एनआयएने दोनही ठिकाणांहून तरुणांना ताब्यात घेतले आहे. भिवंडी आणि अमरावतीमधून ताब्यात घेतलेले दोन्ही तरुण पाकिस्तानी संघटनेच्या संपर्कात होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या या दोघांची कसून चौकशी केली जात आहे.
दरम्यान, अमरावती शहरातील छाया नगर परिसरातून एनआयच्या टीमने एका २७ वर्षे युवकाला रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे . मिळालेल्या माहितीनुसार हा युवक पाकिस्तान मधील एका संघटनेच्या संपर्कात असल्याचा समोर आले आहे . हा तरुण गेल्या सहा महिन्यांपासून पाकिस्तानी संघटनेच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे . अनेक वेळा या तरुणाला पाकिस्तान मधून फोन आल्याचं प्राथमिक सूत्रांनी सांगितले आहे .
एनआयए कडून १७ ठिकाणी छापे
अमरावती शहरासह एनआयए कडून १७ ठिकाणी छापे मारले आहेत . यातून अनेकांना ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. भिवंडी शहरालगतच्या खोणी खाडीपार ग्रामपंचायत परिसरात पहाटेच्या सुमारास आलेल्या पथकाने एकास घेतले ताब्यात आहे. कामरान अन्सारी ४५ असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. पाकिस्तानमध्ये देशविरोधी संघटनेशी संपर्क असल्याचा संशय असल्यानं ही कारवाई करण्यात येत आहे.