
नवी दिल्ली वृत्तसंस्था
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. शक्ती दुबे हा देशातून पहिला आला आहे. दरम्यान, पुण्याचा अर्चित डोंगरे हा देशातून तिसरा आला आहे. अर्चित हा महाराष्ट्रात पहिला आला आहे.अर्चितच्या या यशाने त्याच्या कुटुंबियांना आनंद झाला आहे.अर्चितने दिवसरात्र मेहनत करुन हे यश मिळवले आहे.
यूपीएससी परीक्षा ही सप्टेंबर महिन्यात झाली होती. त्यानंतर पर्सनॅलिटी टेस्ट जानेवारी महिन्यात झली होती. यानंतर त्यातील २४१ उमेदवारांची निवड कण्यात येणार होती. एकूण १००९ उमेदवारांची निवड झाली होती. त्यातून आता २४१ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
शक्ती दुबे याने पहिली रँक मिळवली आहे. यानंतर हर्शिता गोयलने दुसरी रँक तर अर्चितने तिसरी रँक मिळवली आहे. यानंतर शाह मार्गी चिराग याने चौथी रँक मिळवली आहे. आकाश गर्ग याने पाचवी रँक मिळवली आहे. कोमल पुनिया यांने सहावी रँक प्राप्त केली आहे. आयुषी बन्सलने सातवी रँक प्राप्त केली आहे. राज क्रिष्णा झा याने आठवी तर आदित्य विक्रम अग्रवाल याने नववी रँक प्राप्त केली आहे. मयंक त्रिपाठी हे यूपीएससी परीक्षेत देशातून दहावे आले आहेत.
यूपीएससी परीक्षा (UPSC) देऊन प्रशासकीय सेवेत काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. यासाठी तरुण दिवसरात्र एक करुन अभ्यास करतात. अशीच मेहनत या सर्व विद्यार्थ्यांनी घेतली. त्याचे फळ त्यांना मिळाली.
यूपीएससी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आता निवड झालेले उमेदवार लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन (LBSNAA)मध्ये ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येईल. येथे आयएएस (IAS) पदासाठी ट्रेनिंग दिले जाते. तर आयपीएस (IPS) पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलिस अकॅडमीत ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येईल.
हे आहेत ‘टॉप 10’
1. शक्ती दुबे
2. हर्षिता गोयल
3. अर्चित डोंगरे
4. मार्गी शहा
5. आकाश गर्ग
6. कोमल पुनिया
7. आयुषी बन्सल
8. राज कृष्ण झा
9. आदित्य विक्रम अग्रवाल
10. मयंक त्रिपाठी