
नवी दिल्ली वृत्तसंस्था
ऑपरेशन सिंदूर, राष्ट्रीय सुरक्षेपासून तरुणांसाठी ‘दुहेरी भेट’पर्यंत पंतप्रधानांची दणदणीत घोषणा
79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या लाल किल्ल्यावरील ऐतिहासिक भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यंदा फक्त शुभेच्छा नाही, तर थेट राजकीय, धोरणात्मक आणि लष्करी घोषणांची स्फोटक माळ उधळली.
सिंधू करारावर उघडपणे आक्रमण, ऑपरेशन सिंदूरच्या यशाची दिमाखदार मांडणी, राष्ट्रीय सुरक्षेसाठी ‘सुदर्शन चक्र’, तरुणांसाठी आर्थिक योजना, आणि वर्षाअखेरीस ‘मेड इन इंडिया’ चिप्स असा दणदणीत अजेंडा मोदींनी देशासमोर ठेवला.
PM Narendra Modi says, "We are now also heading towards 'Samudra Manthan'. Taking this forward, we want to work in Mission Mode to look for the oil and gas reserves in the sea. So, India is about to launch National Deep Water Exploration Mission."
Video: DD pic.twitter.com/sMPN5QuF8K
— ANI (@ANI) August 15, 2025
सिंधू करारावर थेट हल्ला “आता हा अन्याय संपणारच”
मोदींचा आवाज लाल किल्ल्याच्या भिंतींवरून घुमला
“आता रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही. सिंधू करार किती अन्यायकारक होता हे देशाला समजलं आहे. माझ्या देशाच्या नद्यांचं पाणी शत्रूच्या शेताला पोसत होतं आणि आपल्या शेतकऱ्यांची जमीन पाण्यावाचून तहानलेली होती. सात दशकं आपण हा अपमान सहन केला. आता नाही!
मोदींनी स्पष्ट इशारा दिला की भारताच्या हक्काच्या पाण्यावर केवळ भारताचाच हक्क आहे, आणि हा करार भविष्यात स्वीकारला जाणार नाही. केंद्र सरकारने यासाठी पाणी धोरणात मोठे बदल करण्याची तयारी सुरू केल्याचे संकेतही दिले.
ऑपरेशन सिंदूर “मेड इन इंडिया शौर्याचा विजय
100 दिवस पूर्ण झालेल्या ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत मोदींनी भारतीय लष्कराचं कौतुक केलं.
“मेड इन इंडिया शस्त्रांनी शत्रूला काही सेकंदातच धक्का दिला. जर आपण स्वावलंबी नसतो, तर एवढ्या प्रमाणात कारवाई शक्य झाली नसती.
#WATCH | Delhi: Prime Minister Narendra Modi says, "We have seen the wonders of Made in India in #OperationSindoor. Even the enemy was shocked at the kind of ammunition that was destroying them within seconds. Had we not been self-reliant, would we have been able to carry out… pic.twitter.com/Nx3BU1mCGv
— ANI (@ANI) August 15, 2025
मोदींनी संरक्षण क्षेत्रात स्वदेशीकरणाचं लक्ष्य साध्य करण्याकडे गेल्या 10 वर्षांत झालेले प्रगतीचे टप्पे अधोरेखित केले.
‘समुद्र मंथन’ ” खोल पाण्यातील ऊर्जा शोध मोहीम
भारतातील तेल आणि वायू साठ्यांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय खोल पाण्याचे अन्वेषण अभियान सुरू होणार. मोदींनी याला ‘समुद्र मंथन’ असं नाव देत या मोहिमेला मिशन मोडमध्ये राबवण्याची घोषणा केली.
दिवाळीला ‘दुहेरी भेट’ ” जीएसटीत मोठी सुधारणा
दिवाळीला करभार कमी करण्यासाठी पुढील पिढीतील जीएसटी सुधारणा लागू करण्याचं मोदींचं आश्वासन. यामुळे देशभरातील उद्योग, व्यापारी आणि ग्राहकांना थेट दिलासा मिळणार.
अंतराळातून शुभांशू शुक्लांची परतफेड, गगनयानची तयारी
आयएसएस मोहिमेतून परतलेल्या ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचं विशेष कौतुक. मोदींनी गगनयान मोहिमेत आत्मनिर्भरतेवर भर देत “भारत अंतराळ संशोधनाच्या नकाशावर निर्णायक पावलं टाकतोय” असा विश्वास व्यक्त केला.
तरुणांसाठी ‘विकास भारत योजना’ ” 15 हजार रुपयांची मदत
15 ऑगस्टपासून लागू होणारी योजना जाहीर करत मोदींनी पात्र तरुणांना 15,000 रुपयांची थेट आर्थिक मदत मिळेल असं सांगितलं. रोजगारनिर्मिती आणि कौशल्य विकासाला चालना देण्याचा हेतू.
भारत ” लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था
2047 पर्यंत विकसित देश बनवण्याचं लक्ष्य साध्य करण्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन. महागाई नियंत्रणात असल्याचा दावा करत मोदींनी जागतिक रेटिंग एजन्सी भारताच्या अर्थव्यवस्थेवर विश्वास दाखवत असल्याचं सांगितलं.
मेड इन इंडिया चिप्स ” चार दशकांनंतरचे स्वप्न साकार
एकेकाळी नाकारलेली सेमीकंडक्टर योजना आता वास्तवात; 6 प्रकल्प उभारणी सुरू. वर्षाअखेर भारतीय बनावटीचे चिप्स बाजारात.
ज्योतिबा फुले 200 व्या जयंती वर्ष विशेष कार्यक्रम
मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी विशेष योजना; खेलो इंडिया व राष्ट्रीय क्रीडा धोरणाला गती देण्याची घोषणा. शाळेपासून ऑलिम्पिकपर्यंत खेळांची परिसंस्था तयार करण्यावर भर.
राष्ट्रीय सुरक्षा कवच ‘सुदर्शन चक्र’
“हे केवळ हल्ला परतवणार नाही तर शत्रूवर अनेक पटींनी प्रत्युत्तर करेल” असं सांगत मोदींनी ‘सुदर्शन चक्र’ नावाची नवी प्रगत शस्त्र प्रणाली जाहीर केली.