नवी दिल्ली :
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ आज सायंकाळी सुमार 6.52 वाजता झालेल्या कार स्फोटाने राष्ट्रीय राजधानी हादरली. लाल किल्ल्याच्या पूर्वेकडील दरवाजाजवळ उभ्या असलेल्या ह्युंदाई i20 कारमध्ये अचानक भीषण स्फोट झाला. क्षणार्धात ज्वाळांनी आकाश व्यापलं आणि परिसरातील काही वाहनेही जळून खाक झाली.
स्फोट इतका प्रचंड होता की, १ किलोमीटर परिसरातील इमारतींच्या काच फुटल्या. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर धूर आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाले.मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता सूत्रांनी दिली.
पोलिसांनी जाहीर केलेली प्राथमिक यादी पुढीलप्रमाणे आहे.
मृत व्यक्तींची नावे
१) अशोक कुमार, वय 34 वर्ष – (मूळ रहिवासी, उत्तर प्रदेश)
२) अज्ञात (अद्याप ओळख पटलेली नाही)- वय साधारण 35 वर्ष
३) अज्ञात (अद्याप ओळख पटलेली नाही)- वय साधारण 52 वर्ष
४) अज्ञात (अद्याप ओळख पटलेली नाही)- वय साधारण 35 वर्ष
५) अज्ञात (अद्याप ओळख पटलेली नाही)- वय साधारण 58 वर्ष
६) अज्ञात (अद्याप ओळख पटलेली नाही)- वय साधारण 28 वर्ष
७( अज्ञात (अद्याप ओळख पटलेली नाही)- वय साधारण 30 वर्ष
८)अज्ञात (अद्याप ओळख पटलेली नाही)- वय साधारण 35 वर्ष
* स्फोटातील जखमींची यादी
१) शायना परवीन, वय 23 वर्ष – (मूळ रहिवासी, दिल्ली)
२) हर्षूल सेठी, वय 28 वर्ष – (मूळ रहिवासी, उत्तराखंड)
३) शिवा जैसवाल, वय 32 वर्ष – (मूळ रहिवासी, उत्तर प्रदेश)
४) समीर, वय 26 वर्ष – (मूळ रहिवासी, दिल्ली)
५) जोगिंदर, वय 28 वर्ष – (मूळ रहिवासी, दिल्ली)
६) भवानी शंकर शर्मा, वय 30 वर्ष – (मूळ रहिवासी, दिल्ली)
७) गीता, वय 26 वर्ष – (मूळ रहिवासी, दिल्ली)
८) विनय पाठक, वय 50 वर्ष – (मूळ रहिवासी, दिल्ली)
९) पप्पू, वय 53 वर्ष – (मूळ रहिवासी, आग्रा)
१० विनोद सिंग, वय 55 वर्ष – (मूळ रहिवासी, दिल्ली)
११) शिवम झा, वय 21 वर्ष – (मूळ रहिवासी, दिल्ली)
१२) अज्ञात (पुरूष), वय 26 वर्ष
१३) मोहम्मद शहनवाज, वय 35 वर्ष – (मूळ रहिवासी, दिल्ली)
१४) अंकुश शर्मा, वय 28 वर्ष – (मूळ रहिवासी, दिल्ली)
१५) मोहम्मद फारूख, वय 55 वर्ष – (मूळ रहिवासी, दिल्ली)
१६) तिलक राज, वय 45 वर्ष – (मूळ रहिवासी, हिमाचल प्रदेश)
१७) मोहम्मद सफवान, वय 28 वर्ष – (मूळ रहिवासी, दिल्ली)
१८) मोहम्मद दौड, वय 31 वर्ष – (मूळ रहिवासी, दिल्ली)
१९) किशोरी लाल, वय 42 वर्ष – (मूळ रहिवासी, दिल्ली)
२०) आझाद, वय 34 वर्ष – (मूळ रहिवासी, दिल्ली)
जयप्रकाश नारायण रुग्णालय आणि AIIMS मध्ये दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.


