
मुंबई प्रतिनिधी
गेल्या साडेतीन महिन्यात राज्य सरकारने महाराष्ट्रात प्रशासन विभागात बदल्यांचा धडाकाच सुरू आहे. आयएएस आणि आयपीएस अशा दोन्ही पातळींवर या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. तोच बदल्यांचा सपाटा आता मुंबई महापालिकेत सुरू झाला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी काल महापालिका अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यांनी 7 उपायुक्तांसह तसेच एकूण 12 सहायक आयुक्तांच्या बदल्या केल्या आहेत.एकीकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या चर्चा सुरु झाल्या असताना दुसरीकडे प्रशासकीय पातळीवर खांदेपालट करण्यात येत असल्याचं बोललं जात आहे.
आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच काही दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त भूषण गगरानी यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. तब्बल 74,427.41 कोटींचा हा अर्थसंकल्प होता. अर्थसंकल्पीय अंदाज गेल्या वर्षीच्या तुलनेत 14.19 टक्क्यांनी वाढला आहे. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात भरभक्कम वाढ करण्यात आली होती. यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या होत्या. पण त्यानंतर आता महापालिकेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.