
बिड प्रतिनिधी
बिडमध्ये अनैतिक संबंधातून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथे ही घटना घडली. याप्रकरणी संशयित मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
आष्टी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील विकास बनसोडे (२५ वर्षे) हा तरुण भाऊसाहेब शिरसागर यांच्याकडे कामाला होता. अनैतिक संबंधातून या तरुणाची मालकाकडूनच हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी भाऊसाहेब शिरसागरला आष्टी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आष्टी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे विकास बनसोडे कामाला होता. क्षीरसागर यांच्या मुलीसोबत विकासचे प्रेम प्रकरण होते. घराच्या मागील शेतात आपल्या मुलीबरोबर विकास दिसल्याने भाऊसाहेब क्षीरसागर संतप्त झाले होते. त्यांनी विकासला एका खोलीमध्ये डांबून ठेवत दोन दिवस बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या विकासचा जागीच मृत्यू झाला.
विकासचा मृत्यू झाल्याचे कळतात कडा चौकीला कळविण्यात आले. शवविच्छेदनासाठी विकासचा मृतदेह कडा येथील प्रथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाठवण्यात आला. विकासची हत्या करणाऱ्या मुख्य संशयित आरोपीला आष्टी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.