पत्रकार:उमेश गायगवळे
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज मोठी कारवाई केली आहे. भर वर्दळीचे ठिकाण असणाऱ्या दादरमधून पोलिसांनी तब्बल 10 कोटीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
यातील एक आरोपी हा मुंबईतील असून दुसरा आरोपी पश्चिम बंगालमधील आहे.
राज्यात अमली पदार्थाच्या तस्करीचा आणि व्यवसनाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अमली पदार्थाच्या व्यापारावरून पोलिसांवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
तुळजापूर येथे सापडलेल्या एमडी ड्रग्जचे मुंबई कनेक्शन समोर आले होते. तुळजापूरमध्ये ही ड्रग्ज सापडल्याने खळबळ उडाली होती.
आज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 9 ने मोठी कारवाई केली. गुन्हे शाखेने दादर येथील एका गेस्ट हाऊसवर छापा मारला. या कारवाईत 10 कोटी किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त केले. जवळपास 5 किलोचा एमडी ड्रगजचा साठा आढळून आला. पोलिसांनी मुंबईतील जहांगीर साहा आलम शेख आणि पश्चिम बंगालमधील सेनॉल शेख या दोघांना अटक केली आहे.


