
उमेश गायगवळे
विधवा महिलांना लग्नाचे खोटे आश्वासन देऊन आपल्या प्रेमात अडकून रोख रक्कम सोन्याचे दागिने घेऊन तो पसार व्हायचा आपली पत्नीचे निधन झाले असं खोटं सांगून अनेक महिलांना तो फसवत होता. असे एका महिलेच्या तक्रारीनंतर प पोलिसांनी प्रमोदला अटक केली. कसून चौकशी दरम्यान त्याच्याकडून माहिती समोर आली, त्यांनी किमान ८ विधवा महिलांना फसवल्याचं तसेच त्या महिलांच्या संपर्कात असल्याचा तपासात निष्पन्न झालं. परीमंडळ १२ उपायुक्त स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोशी पोलिसांनी प्रमोद नाईक याला अटक केली आहे. पोलीस गुन्ह्याचा तपास करत असून आणखी गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.