
अहमदनगर प्रतिनिधी
पुणे पोलिस दलात दहा वर्षे नोकरी करत दमदार कामगिरी करणारा ‘तेजा’ नुकताच सेवानिवृत्त झाला आहे. ‘जी २०’ परिषदेमधील सुरक्षा, पंतप्रधान व राष्ट्रपतींच्या दौऱ्याची सुरक्षा, तसेच इतर ठिकाणी सुरक्षेची जबाबदारी समर्थपणे सांभाळणारा तेजा पुणे पोलिस दलात बॉम्ब शोधक पथकातील (बीडीडीएस) कर्मचारी होता.
त्याने अनेकदा महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे. सेवानिवृत्तीनंतर तो अहिल्यानगर तालुक्यातील मनगाव येथील माउली परिवारात सामील झाला आहे.
तेजा हा दुसरा तिसरा कुणी नसून, तो एक गुणी श्वान होता. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह इतर व्हीआयपींच्या दौऱ्यात सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी त्याच्याकडे होती. पुणे पोलिस दलात बॉम्ब छंद शोधक पथकातील महत्त्वाची जबाबदारी त्याच्यावर होती. संपूर्ण पुणे पोलिस दलात त्याचा दबदबा होता. पोलिस दलाने त्याचा सेवानिवृत्ती सन्मान केला.
तेजा हा दुसरा तिसरा कुणी नसून, तो एक गुणी श्वान होता. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह इतर व्हीआयपींच्या दौऱ्यात सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी त्याच्याकडे होती. पुणे पोलिस दलात बॉम्ब शोधक पथकातील महत्त्वाची जबाबदारी त्याच्यावर होती. संपूर्ण पुणे पोलिस दलात त्याचा दबदबा होता. पोलिस दलाने त्याचा सेवानिवृत्ती सन्मान केला.
निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता यावे, यासाठी तेजा आता अहिल्यानगर तालुक्यातील मनगाव येथील माउली प्रकल्पाचा सदस्य झाला आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, बीडीडीएसचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक येळे, पुणे पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा पाटील, मुलाप्रमाणे सांभाळ करणारे एएसआय श्रीमंत, हवालदार डेंगळे, तसेच त्याच्यावर प्रेम करणारे सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी त्याला माउलीच्या स्वाधीन केले.
माउलीचे सदस्य त्याला आणण्यासाठी पुणे येथे आले होते. माउलीच्या मनगाव प्रकल्पामध्ये सध्या पाच श्वान असून, त्यांचा वापर मानसिक आजारावर थेरपी डॉग म्हणून केला जातो. लॅब्रेडोर जातीच्या श्वानाचा थेरपी डॉग म्हणून फार चांगला उपयोग होतो, त्याचा येथील रुग्णांना फायदा होत असल्याचे माउलीच्या सदस्यांनी सांंगितले. आता माउली प्रकल्पात तेजा सामील झाला आहे. त्याचा येथील प्रत्येक सदस्याला आनंद आहे.