
मुंबई:प्रतिनिधी
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिसांह इतर सेवा दलांतील पदक विजेत्यांची नावे केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केली आहेत. एकूण 942 जणांना या पदकांनी गौरव करण्यात येणार असून त्यात पोलीस, अग्निशन दलाचे जवान, होमगार्ड तसेच सीमा सुरक्षा दल, सीआरपीएफ, सशस्त्र सीमा दलांतील जवानांचा समावेश आहे.
एकूण 95 शौर्य पदके असून त्यात सर्वाधिक 19 पदके सीआरपीएफला आहेत. राज्याचा विचार करता उत्तर प्रदेश सर्वाधिक 17 पदकांचा मानकरी ठरला आहे. राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदके 101 तर, गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 746 पदके जाहीर करण्यात आली आहे. या दोन्ही श्रेणींमध्ये एकूण 719 पोलिसांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात एकूण 43 पोलीस या पदकांचे मानकरी ठरले असून त्यात चौघांना विशिष्ट सेवा पदके तर, 39 जणांना गुणवत्तापूर्ण सेवा पदके घोषित झाली आहेत. अतिरिक्त महासंचालक ‘आयर्नमॅन’ डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्यासह अन्य तिघांचा विशिष्ट सेवा पदकांनी गौरव करण्यात आला आहे. महानिरीक्षक दत्तात्रय राजाराम कराळे, महानिरीक्षक सुनील बळीरामजी फुलारी आणि कमांडंट रामचंद्र बाबू केंडे यांना विशिष्ट सेवा पदकाने गौरविण्यात येणार आहे.
संजय भास्कर दराडे, महानिरीक्षक; वीरेंद्र मिश्रा, महानिरीक्षक; आरती प्रकाशसिंह, महानिरीक्षक; चंद्रकिशोर रामजीलाल मीना, महानिरीक्षक; दीपक कृष्णाजी साकोरे, उपमहानिरीक्षक; राजेश रामचंद्र बनसोडे, पोलीस अधीक्षक; सुनील जयसिंग तांबे, पोलीस उपअधीक्षक; ममता लॉरेन्स डिसूझा, सहाय्यक पोलीस आयुक्त; धर्मपाल मोहन बनसोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त; मधुकर माणिकराव सावंत, निरीक्षक; राजेंद्र कारभारी कोते, निरीक्षक; रोशन रघुनाथ यादव, पोलीस उपअधीक्षक; अनिल लक्ष्मण लाड, पोलीस उपअधीक्षक; अरुण केरभाऊ डुंबरे, सहाय्यक पोलीस आयुक्त; नजीर नसीर शेख, उपनिरीक्षक; श्रीकांत चंद्रकांत तावडे, उपनिरीक्षक; महादेव गोविंद काळे, उपनिरीक्षक; तुकाराम शिवाजी निंबाळकर, उपनिरीक्षक; आनंदराव पुंजाराव मस्के, सहाय्यक उपनिरीक्षक; रवींद्र बाबुराव वानखेडे, उपनिरीक्षक, सुरेश चिंतामण मनोरे, निरीक्षक; राजेंद्र देवमान वाघ, उपनिरीक्षक; संजय अंबादासराव जोशी, सहाय्यक उपनिरीक्षक; दत्तू एकनाथ गायकवाड, सहाय्यक उपनिरीक्षक; नंदकिशोर ओंकार बोरोले, सहाय्यक उपनिरीक्षक; आनंद रामचंद्र जंगम, सहाय्यक उपनिरीक्षक; सुनीता विजय पवार, सहाय्यक उपनिरीक्षक; जितेंद्र विठ्ठल म्हात्रे, सहाय्यक उपनिरीक्षक; प्रफुल्ल रामचंद्र सुर्वे, सहाय्यक उपनिरीक्षक; राजेंद्र शंकर काळे, सहाय्यक उपनिरीक्षक; सलीम गनी शेख, सहाय्यक उपनिरीक्षक; तुकाराम रावसाहेब आव्हाळे, सहाय्यक उपनिरीक्षक; रामभाऊ संभाजी खंडागळे, हेड कॉन्स्टेबल; संजय भास्करराव चोबे, हेड कॉन्स्टेबल; सय्यद इक्बाल हुसेन सय्यद माथार हुसेन, सहाय्यक उपनिरीक्षक; विजय दामोदर जाधव, हेड कॉन्स्टेबल; रामराव वामनराव नागे, सहाय्यक उपनिरीक्षक; दिलीप भोजुसिंग राठोड, हेड कॉन्स्टेबल; आयुबखान अकबर मुल्ला, हेड कॉन्स्टेबल.