मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या प्रशासनात मोठी उलथापालथ घडवणारा निर्णय राज्य सरकारने घेतला असून एकाचवेळी तब्बल २५ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. मंत्रालयातून यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) प्रसिद्ध करण्यात आला असून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नवीन पदांचा कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या बदल्यांमुळे राज्यातील अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमधील जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तसेच विविध विभागांतील वरिष्ठ पदांवर मोठे फेरबदल झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर, नागपूर, सोलापूर, चंद्रपूर, बुलढाणा यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये नवीन जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्रशासनात मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू झाल्या असून काही महत्त्वाच्या प्रकल्पांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची यादी
१) श्रीकांत (IAS: 2009) – आयुक्त, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका – मुख्य कार्यकारी अधिकारी, जल जीवन मिशन, नवी मुंबई.
२) दिलीप स्वामी (IAS: 2011) – जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला.
३) वर्षा ठाकूर-घुगे (IAS: 2011) – जिल्हाधिकारी, लातूर – सह-मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), मुंबई.
४) दीपक सिंगला (IAS: 2012) – अतिरिक्त आयुक्त, PMRDA पुणे – आयुक्त, मनरेगा (MGNREGS), नागपूर.
५) के. मंजुलेक्ष्मी (IAS: 2013) – आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका – अतिरिक्त आयुक्त, PMRDA, पुणे.
६) डॉ. राजेंद्र भारूड (IAS: 2013) – प्रकल्प संचालक (RUSA), उच्च व तंत्रशिक्षण विभाग – आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका.
७) डॉ. प्रवीणकुमार देवरे (IAS: 2013) – आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, पुणे – जिल्हाधिकारी, बुलढाणा.
८) डॉ. भारत बास्तेवाड (IAS: 2013) – आयुक्त, MGNREGS नागपूर – जिल्हाधिकारी, लातूर.
९)वर्षा लड्डा (IAS: 2013) – महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे – आयुक्त, अमरावती महानगरपालिका.
१०) अमोल येडगे (IAS: 2014) – जिल्हाधिकारी, कोल्हापूर – आयुक्त, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका.
११) डॉ. विजय राठोड (IAS: 2014) – सह-मुख्य कार्यकारी अधिकारी, MIDC – जिल्हाधिकारी, कोल्हापूर.
१२) विनय गौडा जी.सी. (IAS: 2015) – जिल्हाधिकारी, चंद्रपूर – जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर.
१३) डॉ. किरण पाटील (IAS: 2015) – जिल्हाधिकारी, बुलढाणा – आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, पुणे.
१४) डॉ. मंगेश गोंदवले (IAS: 2015) – व्यवस्थापकीय संचालक, MAIDC – जिल्हाधिकारी, गोंदिया.
१५) कुमार आशीर्वाद (IAS: 2016) – जिल्हाधिकारी, सोलापूर – जिल्हाधिकारी, नागपूर.
१६) वसुमाना पंत (IAS: 2017) – अतिरिक्त आयुक्त, नागपूर महानगरपालिका – जिल्हाधिकारी, चंद्रपूर.
१७) प्रजित नायर (IAS: 2017) – जिल्हाधिकारी, गोंदिया – अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका.
१८) अंकित (IAS: 2019) – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर – अतिरिक्त आयुक्त, नागपूर महानगरपालिका.
१९) कार्तिकयेन एस. (IAS: 2020) – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर – जिल्हाधिकारी, सोलापूर.
२०) संजिता मोहपात्रा (IAS: 2020) – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती – आयुक्त, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका.
२१) मिन्नू पी. एम. (IAS: 2021) – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर.
२२) सत्यम गांधी (IAS: 2021) – आयुक्त, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती.
२३) जास्मिन (IAS: 2022) – सहाय्यक जिल्हाधिकारी, राजापूर उपविभाग, रत्नागिरी – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर.
२४) अंजली शर्मा (IAS: 2022) – नियुक्ती: आयुक्त, जालना महानगरपालिका.
२५) कृष्णकांत कंवारिया (IAS: 2022) – सहाय्यक जिल्हाधिकारी, शहादा उपविभाग, नंदुरबार – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना.
प्रशासनात हालचालींना वेग
या मोठ्या फेरबदलामुळे राज्यातील अनेक महत्त्वाच्या विभागांमध्ये नवीन नेतृत्वाची एंट्री झाली आहे. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि विविध प्रकल्पांमध्ये नव्या अधिकाऱ्यांमुळे कामकाजाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मंत्रालयात मोठी चर्चा रंगली असून आगामी काळात आणखी काही बदल होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.


