
स्वप्नील गाडे – वार्ताहर
नालासोपरा येथे लैगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.७वर्षाच्या चिमुकलीवर लैगिक अत्याचार केला गेला. या प्रकरणी नालासोपारा पेल्हार पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली असून अल्पवयीन आरोपी फरार झाला आहे.शुभम वर्मा वय-३० असे संशयित आरोपीचे नाव आहे व फरार अल्पवयीन आरोपी वय-१४ आहे.पीडित मुलीला मंगळवारी रात्री ९च्या सुमारास आरोपी शुभम वर्मा आणि १४वर्षीय आरोपीने नालासोपारा धानिवबाग येथील एका गल्लीत गाळ्यात घेऊन जाऊन वर्मा याने ७वर्षाच्या चिमुकलीवर लैगिक अत्याचार केला तर १४वर्षाच्या फरार आरोपीने आपल्या मोबाईल मध्ये चित्रीकरण केले.हा
पीडित मुलीवर घडलेला प्रकार मुलीने घरी येऊन आपल्या आईला सांगितला.मुलीच्या आईने तात्काळ पेल्हार पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.पोलिसांनी दोन्ही आरोपीविरोधात भा.द.वि.कलम ६५(२),७७तसेच बालकांचे लैगिक अत्याचारापासून सौरक्षण कायदा (पोक्सो)अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.या घटनेतील आरोपी शुभम वर्मा याला अटक केली आहे व अल्पवयीन आरोपी याचा शोध सुरू असल्याचे पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वन कोटी यांनी सांगितले.मागील महिन्या भरात नालासोपारा परिसरात ही सातवी लैगिक अत्याचाराची घटना घडली आहे