
वार्ताहर-स्वप्नील गाडे . राष्ट्रवादी पार्टी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुण्याहून विशेष विमानाने मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटल मध्ये तातडीने गुरुवार दि-२६.९.२०२४रोजी ऍडमिट करण्यात आले.या पूर्वीही नोव्हेंबर२०२२ मध्येही छगन भुजबळ यांना व्हायरल इन्फेक्शन झाल्या कारणाने बॉम्बे हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले गेले होते.तेव्हा ही भुजबळ यांची प्रकृती खालावली होती बॉम्बे हॉस्पिटल मध्ये योग्य उपचार घेऊन डीचार्ज घेतला होता.परंतु पुन्हा दोन वर्षांनी भुजबळ यांची प्रकृती अस्वस्त झाल्याने तातडीने त्यांना विशेष विमानाने मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे
छगन भुजबळांना मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटल मध्ये केले दाखल