
पत्रकार :उमेश गायगवळे
मुंबई:खेरवाडी पोलीस ठाणे अंतर्गत तसेच गहाळ मोबाईल, मौल्यवान वस्तू तसेच एकूण ५० मोबाईल आणि मौल्यवान वस्तू पोलिसांनी हस्तगत केले असून ते नागरिकांना महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या अनुषंगाने आज तक्रार दारांना सुपूर्द करण्यात आले.
खेरवाडी पोलीस ठाण्यांतर्गत मोबाईल चोरी, मौल्यवान वस्तू यांच्या जबरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असतानाच खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कविदास जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष गुन्हे प्रटीकरण पथक तसेच पोलीस निरीक्षक डुबल, पोलीस निरीक्षक कोरके, स पो न. भिसे पोलीस पो उ नि लोंढे यांच्या अथक प्रयत्नानंतर १३,६४,७०० रू माल हस्तगत करण्यात आला होता.
साधारण २ लाख ६६ हजार ७०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्याचबरोबर गुन्हा क्रमांक ७२८/२८ मधील ४,२८,०००/ किमतीचे सोन्याचे दागिने ५० मोबाईल मौल्यवान वस्तू असा ६७००००/ असा एकूण १३ लाख ६४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल तक्रार यांना आज महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या अनुषंगाने तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आले . तक्रारदारांना आपला मुद्देमाल परत मिळाल्याने तक्रारदार नागरिकांमध्ये तसेच समाधान व्यक्त केले जात आहे.