
मुंबई:प्रतिनिधी
मुंबईत पोलिसांकडून तगडा बंदोबस्त पाहायला मिळत असून मुंबई पोलिसांकडून पाच पेक्षा अधिक लोकांना बेकायदेशीररित्या १५ दिवस एकत्र येण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. मुंबई पोलिसांकडून शहरात ९ जानेवारी ते २३ जानेवारीपर्यंत एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.
एका मीडिया रिपोर्टनुसार, मुंबई शहराच्या सुरक्षेच्या कारणात्सव पोलिसांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. २३ जानेवारीपर्यंत पोलिसांनी प्रतिबांधात्मक आदेश काढला आहे. मुंबई शहरातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न होऊ नये, यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ५ पेक्षा अधिक लोकांना बेकायदेशीरित्या एकत्र येण्यास मज्जाव मनाई आदेशाद्वारे करण्यात आला आहे.
पोलिसांच्या मनाई आदेशात विवाह, अंत्यसंस्कार, सहाकारी संस्था,सामाजिक संघटना, कंपन्या आणि सरकार संबंधित कार्यक्रमासाठी सुट देण्यात आली आहे. शहरातील शांतता भंग होणार नाही यासाठी हा आदेश काढण्यात आला आहे. या प्रतिबंधित कालावधित सुरक्षेच्या प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार, हा मनाई आदेश लागू केला जातो. शहरात १५ दिवसांसाठी पोलिसांकडून मनाई आदेश जारी करण्यात येतो. राजकीय वातावरण आणि अन्य कारणांवरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या आदेशानुसार, पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठल्याही प्रकारचे आंदोलन किंवा निदर्शनं करता येणार नाही.