
चेन्नई वृत्तसंस्था
तमिळ सिनेसृष्टीतील सुपरस्टार आणि ‘तमिझगा वेत्री कळगम’ (TVK) पक्षाचे नेते विजय यांच्या करूरमधील सभेत शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांची संख्या ३६ वर पोहोचली आहे. यामध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचा समावेश असून, ५० हून अधिक जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
अभिनेता विजय की रैली में भगदड़, दिल दहला देने वाले दृश्य आ रहे हैं, मृतकों की संख्या बढ़कर 31 हो गई है 100 से ज्यादा लोग गंभीर रूप से घायल है। pic.twitter.com/ekakshn0AZ
— Naarad (@naaradbaba) September 27, 2025
शनिवारी संध्याकाळी करूर-एरोड महामार्गावरील वेलुसामीपुरम येथे विजय यांची ‘वेलिचम वेलीयेरू’ (प्रकाश पसरवा) मोहीम आयोजित करण्यात आली होती. लाखोंच्या संख्येने जमलेल्या गर्दीत अचानक गोंधळ उडाला. प्रचंड दाटलेल्या जमावामुळे अनेकांना श्वसनाचा त्रास होऊन ते खाली पडले. काहीजणांवर गर्दीचा ढिगारा कोसळला. यामुळे मोठा जीवितहानीचा प्रसंग घडला.
सभेदरम्यान एक मूल बेपत्ता झाल्याचे समजताच विजय यांनी भाषण तात्काळ थांबवले. “पोलिस, कृपया मदत करा” असे आवाहन करत ते स्वतः मदतीसाठी पुढे सरसावले. मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली.
विजय यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून, पीडित कुटुंबांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे त्यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे. पक्षाच्या वतीने मदतकार्यही सुरू करण्यात आले आहे.
सरकारची तातडीची मदत
दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी शोक व्यक्त करत तातडीच्या मदतीची घोषणा केली. जखमींवर त्वरित उपचार व्हावेत, यासाठी करूरसह एरोड आणि तिरुचिरापल्ली मेडिकल कॉलेजमध्ये रुग्ण हलविण्यात आले आहेत. सर्व डॉक्टरांना तातडीने हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत. मृतदेह वाहतुकीसाठी अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली असून रक्तदान शिबिरे उभारण्यात आली आहेत.
सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न
या सभेला ३० हजारांहून अधिक लोकांनी हजेरी लावली होती. मात्र गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरल्याची चर्चा आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
The unfortunate incident during a political rally in Karur, Tamil Nadu, is deeply saddening. My thoughts are with the families who have lost their loved ones. Wishing strength to them in this difficult time. Praying for a swift recovery to all those injured.
— Narendra Modi (@narendramodi) September 27, 2025
पंतप्रधान मोदींच्या संवेदना
करूर येथे झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती मी मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकर बरे वाटावे, ही प्रार्थना करतो,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून म्हटले आहे.