
पत्रकार:उमेश गायगवळे
शैक्षणिक, सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुण्याला विद्येचे माहेर घर म्हणूनही जाते.या पुण्याने लेखक, साहित्यिक पत्रकार, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकिय नेते, आदी मंडळीने या पुण्याचे नाव देशासह जगाच्या पटलावर नेहुन ठेवले.अशा या सुसंस्कृत पुण्यात वाढत्या गुन्हेगारीचा विळखा बसला आहे.
गेल्या काही वर्षांतील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांनी पुण्याचे नांव बदनाम झाले हे खेदाने म्हणावे लागेल.
खून, दरोडे, लूटमार, अत्याचार, बलात्कार, हत्या, खंडणी अशा घटना नेहमीच्याच होत असताना,
कोयता ग्या़ंग, गाड्यांची तोडफोड, अशा
घटना नेहमीच्याच होताना दिसतात. त्यामुळे रहिवाशांमध्ये, नागरीकांमध्ये भितीच वातावरण आहे अनेक महापुरुषांचा वारसा लाभलेल्या या शहराचे नांव जगाच्या पटलावर आहे.
एकीकडे पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचे शाहू फुले आंबेडकरचे गोडवे गायचे आणि दुसरीकडे मात्र गुन्हेगारी कारवाया बद्दल केवळ खपवून घेतले जाणार नाही?कठोर कारवाई करू? कुणाला सोडणार नाही? अशा वल्गना राजकीय नेते नेहमीच करत आली आहे.मा मात्र खून, दरोडे, हत्या, अत्याचार बलात्कार हिंसाचार अशा घटनांतील आरोपींना शिक्षा मात्र होताना दिसत नाही. अशा घटनांतील मुख्य सूत्रधार तर कधीच सापडले नाहीत. त्याचे एक उदाहरण म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख नरेंद्र दाभोळकर होय? अशी अनेक उदाहरणे देता येतील
गेल्याच आठवड्यात पुण्यातील हडपसर येथील एका पत्नीने आपल्या पतीची पाच लाख रुपये देऊन हत्या घडवून आणली या घटनेने पुण्यासह महाराष्ट्र हादरला.
पुणे जागतिक दर्जाचे शहर म्हणून ओळखले जाते आय टी हब त्याचबरोबर मोठमोठे उद्योग, कारखाने पुण्याची वाढती लोकसंख्या आता संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहे का? ठरले असतील तर ते का?
देशाच्या पटलावर पुण्याच्या नावाचा लौकिक असताना वाढत्या गुन्हेगारी कारवायामुळे या शहराचा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक असणारी ओळख पुसली तर जाणार नाही ना? अशी शंका येणे स्वाभाविक आहे.