मुंबई: प्रतिनिधी
नवीन वर्षाच्या स्वागताची सध्या सर्वत्र धूम दिसून येत आहे. यामुळे ३१ डिसेंबरला पार्टीचा प्लॅन केला असेल तर मुंबई पोलिसांकडून नियमावली जारी करण्यात आली आहे.
यामध्ये सार्वजनिक ठिकाणी गाणी लावणे ते अन्य काही गोष्टींसाठी स्थानिक पोलिसांकडून परवानगी घेणे अत्यावश्यक असणार आहे.
नियमावलीमध्ये काय म्हटलेय…
पोलिसांनी जारी केलेल्या नियमावलीनुसार, गच्चीवर पार्टीचा प्लॅन असल्यास त्याच्या जहूबाजू पडद्याने झाकून घ्या. जेणेकरुन कोणतीही दुर्घटना घडली जाणार नाही.
पब्स, बार आणि रेस्टॉरंट्स पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
गच्चीवरील पार्टीवेळी मध्यरात्रीपर्यंत गाणी सुरू ठेवायची असल्यास त्याचा मर्यादेत आवाज असावा. याशिवाय गच्चीवरील पार्टीत ड्रग्ज किंवा अन्य गोष्टींची तपासणी पोलिसांकडून केली जाणार आहे.
जुहू, वर्सोवा, वांद्रे बँडस्टँड, वरळी सी फेस, मरिन ड्राइव्ह आणि गोराई बीचच्या ठिकाणी स्पेशल पोलिसांचे पथक तैनात केले जाणार आहे. बीचवर नागरिकांना नेहमीप्रमाणे फिरण्यास परवानगी असणार आहे.
मुंबईतील हॉटेल्स, मॉल्स किंवा अन्य ठिकाणी ३१ डिसेंबरच्यावेळी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामुळे कार्यक्रमांवेळी काही नियम आणि गाइडलाइन्सचे पालन करण्यासह वरिष्ठ पोलिसांसोबत त्याचा प्लॅन शेअर करणे.
मुंबईत नवं वर्षावेळी केल्या जाणाऱ्या पार्टीदरम्यान 8अतिरिक्त आयुक्त, २९ उपायुक्त, ५३ सहाय्यक आयुक्त, २१८४ पोलीस अधिकाऱ्यांसह वाहतूक कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.
मुंबईतील महत्वाच्या ठिकाणी (एसआरपीएफ)(क्यूआरटी टीम )(बीडीडीएस स्क्वॉड(आरसीपी युनिट्स आणि होम गार्ड्स तैनात असणार आहेत.
ड्रिंक अँड ड्राइव्हच्या घटनेवर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. याशिवाय बेशिस्तपणे वागणे, अनधिकृतपणे दारु विक्री आणि ड्रग्जसंबंधित काही गोष्टी समोर आल्यास कारवाई केली जाणार आहे.
मुंबई पोर्ट ट्रस्टकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबरला बोट पार्टीसाठी परवानगी देण्यात आलेली नाही.


