
सातारा प्रतिनिधी न्युज नेटवर्क
संसद भवनाजवळ बुधवार, २५ डिसेंबर रोजी मोठी खळबळ उडाली. संसद भवनाजवळ एका व्यक्तीने अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतल्याची घटना घडली. यात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांना घटनास्थळावर पेट्रोलची बाटली मिळाली आहे. त्याचबरोबर पोलिसांना घटनास्थळावर दोन पानांची चिठ्ठी मिळाली आहे. ती अर्धवट जळाली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने संसदेबाहेर येत स्वत:वर अंगावर ज्वलनशील द्वाव्य टाकून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. संबंधित घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आंदोलक नेमका कोण होता? त्याने असे का केले? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. दरम्यान, संबंधित व्यक्तीने स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर संसदेबाहेरील पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. या घटनेत संबंधित व्यक्ती जखमी झालीय. त्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.