
संगमनेर प्रतिनिधी
शिवसेनेचे संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यावर गुरुवारी हल्ला झाला. संगमनेर फेस्टिव्हलच्या उद्घाटनावेळी हात मिळवण्याच्या बहाण्याने एका तरुणाने आमदारांवर झेप घेतली. मात्र सुरक्षारक्षकांनी वेळेवर हस्तक्षेप करत हल्लेखोराला पोलिसांच्या ताब्यात दिले.
संगमनेरमधील जनतेला शांततेचे आवाहन! कायद्याचे राज्य आहे, दोषींना कायद्याने शिक्षा होईल! हल्ला करणारे कोणाचे हस्तक आहेत हे पोलिस तपासातून निश्चित कळेल… कृपया सर्वांनी भावनेचा उद्रेक होऊ देऊ नका; शांतता राखा. pic.twitter.com/KVyr3i0pJf
— Amol Khatal Patil – अमोल खताळ पाटील (@amolkhatalpatil) August 28, 2025
घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मोठ्या संख्येने खताळ समर्थक पोलिस ठाण्याबाहेर जमले होते. मात्र आमदार खताळ यांनी शांततेचे आवाहन केले. हल्ल्याचा उद्देश काय, याचा तपास सुरू असून स्थानिक राजकीय वैमनस्य कारणीभूत असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या घटनेचा निषेध नोंदवत महायुतीच्या आमदार,कार्यकर्त्यांवर वारंवार हल्ले होत असतील, तर त्यालाच उत्तर द्यावे लागेल, असा इशाराही दिला.