
वृत्तसंस्था
मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात नातेसंबंधांना कलंक लावणारी धक्कादायक घटना उघड झाली आहे. मुले म्हटलं की ती वृद्धापकाळचा आधार, तर पत्नीला जीवनसाथी मानले जाते.
मात्र रिटायर्ड डीएसपी प्रतीपालसिंह यादव यांच्या बाबतीत हे नातेसंबंधच भयंकर हिंसाचारात बदलले. पैशासाठी घडलेला हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यातही कैद झाला आहे.
ये पैसा है, जिसके लिए रिश्तों को कैसे कलंकित किया जाता है… तस्वीरों में देख सकते हैं।
मामला शिवपुरी जिले की है, रिटायर्ड DSP प्रतिपाल सिंह यादव का कलयुगी बेटा और पत्नी, रिटायर्ड डीएसपी को रस्सी से बांधकर घसीटा, एक बेटा सीने पर बैठ गया और दूसरे ने पैर पकड़कर खींचा, पत्नी… pic.twitter.com/CcdbHWEWPW— Krishan Choudhary (@choudharykrs) August 25, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीपालसिंह यादव यांना त्यांच्या पत्नी माया यादव आणि दोन मुल आकाश व आभास यांनी अर्धनग्न अवस्थेत बांधून रहाण केली. एका मुलाने छातीवर बसून हात दाबून ठेवले, तर दुसऱ्याने पाय बांधले. एवढंच नव्हे तर त्यांचा मोबाईल आणि एटीएम कार्ड देखील हिसकावून घेतले. जबरदस्तीने त्यांना सोबत नेण्याचा प्रयत्न सुरू होता. यावेळी गावकऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर प्रतीपालसिंह यांची सुटका झाली. हा वाद रिटायरमेंटनंतर मिळालेल्या लाखो रुपयांच्या रकमेवरून झाल्याचे समजते. प्रतिपालसिंह मागील 15 वर्षांपासून पत्नी व मुलांपासून वेगळे राहत होते. पत्नी माया यादव हिने त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा दावा करत, त्यांना सोबत नेण्यासाठीच हा प्रयत्न केल्याचे सांगितले.
प्रतिपालसिंह यादव मार्च 2025 मध्ये श्योपुर येथून डीएसपी पदावरून सेवानिवृत्त झाले होते. घटनेनंतर त्यांनी पत्नी व मुलांविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. पिछोरचे एसडीओपी प्रशांत शर्मा यांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.