
पुणे (विभागीय प्रतिनिधी सुनील कलशेट्टी
पुणे (दिनांक २३ डिसेंबर)-येवलेवाडी भागातील डॉफोडील्स सोसायटीच्या चेअरमन पदी श्री सुधीर मल्लेश बनसोडे यांची निवड झाली. तर सेक्रेटरी पदी विकास कुंभार, तर खजिनदार पदी छाजेड यांची निवड झाली.
सोसायटीचा विकास आणि सर्व एकजुटीने पुढे जाण्यासाठी सर्वस्व पणाला लावून काम करू अशी ग्वाही नवनिर्वाचित चेअरमन सुधीर बनसोडे यांनी दिली.
दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोजी पुणे येवलेवाडी भागातील कामठे नगर मधील यशोधन डॉफोडील्सच्या सोसायटी परिसरात मतदान झाले. निवडणुकीचे कामकाज श्री उज्वल सोनटक्के यांनी पाहिले. त्यावेळी सोसायटी सभासद आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सर्वांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.